चुकीच्या पद्धतीने पाणी प्याल तर डोकं दुखेल आणि पोटही फुगेल, त्रास टाळायचा असेल तर योग्य पद्धत पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 09:58 IST2026-05-09T09:52:53+5:302026-05-09T09:58:37+5:30

How to drink water : अनेकजण विचारच करत नाहीत की, शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी केवळ पाणी पित राहणं पुरेसं नाही. तर पाणी पिण्याची योग्य पद्धतही महत्वाची ठरते. 

Mistakes you are making while drinking water, know the right way | चुकीच्या पद्धतीने पाणी प्याल तर डोकं दुखेल आणि पोटही फुगेल, त्रास टाळायचा असेल तर योग्य पद्धत पाहा

चुकीच्या पद्धतीने पाणी प्याल तर डोकं दुखेल आणि पोटही फुगेल, त्रास टाळायचा असेल तर योग्य पद्धत पाहा

How to drink water : उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी आणि शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी हेल्थ एक्सपर्ट दिवसभर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. कारण जास्त घाम गेल्यामुळे शरीरातील पाणी कमी होतं आणि त्यासोबतच शरीरातील आवश्यक पोषक तत्वही बाहेर पडतात. तसेच डिहायड्रेशनचा त्रास होतो. अशात जास्तीत जास्त लोकांचा हाच समज असतो की, दिवसभर थोडं थोडं पाणी पित राहणं पुरेसं आहे. पण अनेकजण विचारच करत नाहीत की, शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी केवळ पाणी पित राहणं पुरेसं नाही. तर पाणी पिण्याची योग्य पद्धतही महत्वाची ठरते. 

चुकीच्या पद्धतीने पाणी पिता आहात का?

डॉक्टरांच्या मते, अनेकांना वाटतं की पाणी पिणं खूप सोपं आहे. पण ते कसं प्यावं यावरही आरोग्य अवलंबून असतं. एकाच वेळी खूप जास्त आणि घाईघाईने पाणी प्यायल्यास शरीरातील आवश्यक इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन बिघडू शकतं. त्यामुळे पोट फुगणे, डोकेदुखी यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच, जेवण झाल्यानंतर लगेच मोठ्या प्रमाणात पाणी प्यायल्याने पोटातील आम्ल पातळ होतं. यामुळे पचनक्रिया मंदावू शकते आणि अन्न नीट पचण्यास अडचण येऊ शकते.

लोकांची सर्वात सामान्य चूक

डॉक्टर सांगतात की अनेक लोक तहान लागेपर्यंत पाणी पित नाहीत. पण तहान लागणे हे प्रत्यक्षात डिहायड्रेशनचे उशिरा दिसणारे लक्षण आहे. दिवसभर नियमित पाणी न प्यायल्यास थकवा, त्वचा कोरडी पडणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचण आणि पुढे जाऊन किडनीसंबंधित समस्या उद्भवू शकतात. तसेच, सतत खूप थंड पाणी पिण्यामुळे काही लोकांच्या पचनक्रियेवर आणि घशावरही परिणाम होऊ शकतो.

पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?

डॉक्टरांच्या मते, पाणी हळूहळू आणि घोटघोट करून प्यावे. एकदम गटागट पाणी पिणे टाळावे. दिवसाची सुरुवात एका ग्लास कोमट पाण्याने केल्यास मेटाबॉलिझम आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. एकाच वेळी खूप पाणी पिण्यापेक्षा थोड्या अंतराने थोड्या-थोड्या प्रमाणात पाणी पिणं अधिक चांगलं असतं. जेवणानंतर लगेच जास्त पाणी पिणे टाळावे. गरज वाटल्यास छोटे घोट घ्यावेत. आपल्या शरीराचे संकेत समजून घेणे आणि संतुलित आहार घेणे हे शरीर हायड्रेटेड आणि निरोगी ठेवण्याचे खरे रहस्य आहे.

Web Title : गलत तरीके से पानी पीने से सिरदर्द और पेट फूलना: सही तरीका

Web Summary : सही तरीके से पानी पीना ज़रूरी है। गटागट पीने से बचें; धीरे-धीरे पिएं। गुनगुने पानी से शुरुआत करें। भोजन के बाद अत्यधिक नहीं, नियमित रूप से थोड़ी मात्रा में पिएं। जलयोजन के लिए अपने शरीर की सुनें।

Web Title : Drink water correctly to avoid headaches and bloating: Proper way.

Web Summary : Drinking water the right way is crucial. Avoid gulping; sip slowly. Start with lukewarm water. Drink regularly in small amounts, not excessively after meals. Listen to your body for hydration cues.