शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

Corona Virus : चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे अनेकांंनी गमावला जीव, भारतातही अलर्ट जारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 11:28 AM

Corona and SARs Virus : चीनमध्ये सध्या कोरोना नावाच्या एका व्हायरसने थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

चीनमध्ये सध्या कोरोना नावाच्या एका व्हायरसने थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी या व्हायरसवर कंट्रोल मिळवण्याचे आदेश दिले आहेत. 

चीनमध्ये हा व्हायरस पसरल्यानंतर भारत, अमेरिकासहीत अनेक देशांमध्ये सार्स व्हायरससाठी अलर्ट जारी केला आहे. लॉस एन्जेलिस टाइम्सच्या वृत्तानुसार, चीननंतर हा घातक व्हायरसने  थायलॅंड आणि जपानमध्येही आपले पाय पसरले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या एका रिपोर्टनुसार, हा व्हायरस वेगाने पसरत आहे आणि आतापर्यंत ६५ लोकांचा याने जीव गेला आहे.

चीनसोबतच भारत सरकारनेही कोरोना व्हायरसबाबत दुजोरा दिला आहे. भारतात हा व्हायरस पसरू नये यासाठी एअरपोर्टवर प्रवाशांची मेडिकल टेस्ट केली जात आहे. यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, Severe acute respiratory syndrome किंवा SARS निमोनियाचं घातक रूप आहे. चला जाणून घेऊ या कोरोना व्हायरसबाबत....

सी-फूड ठरू शकतं कारण

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, कोरोना व्हायरस सी-फूडसंबंधी एक आजार आहे. हा आजार चीनमध्ये सी-फूड बाजारातून पसरला आहे. हा व्हायरस उंट, मांजर, वटवाघूळसहीत अनेक प्राण्यांमध्ये पसरल्यानंतर मनुष्यांमध्ये वेगाने पसरतो.

या व्हायरसची लक्षणे निमोनियासारखीच आहेत. कोरोना व्हायरसने संक्रमित रूग्णाला सर्वातआधी श्वास घेण्याची समस्या होते. त्यासोबतच आणखीही काही लक्षणे बघायला मिळतात. जसे की, घशात वेदना किंवा जळजळ होणे, सर्दी, खोकला, ताप आणि किडनीशी संबंधित समस्याही होऊ शकतात.

कोरोना व्हायरसवर उपचार

सध्या तरी कोरोना व्हायरसपासून बचावासाठी कोणत्याही प्रकारचं वॅक्सीन उपलब्ध नाही. या व्हायरसने पीडित लोकांवर इतर औषधांच्या माध्यमातून उपचार केले जात आहेत. वैज्ञानिक या व्हायरसला नष्ट करण्यासाठी वॅक्सीन आणि उपचारावर काम करत आहेत.

काय टाळावे?

- कोरोना व्हायरस सी फूडच्या माध्यमातून पसरतो. त्यामुळे शक्य असल्यास सध्या सी फूड खाणे टाळावे.

- बाहेर किंवा ऑफिसमध्ये लोकांशी हात मिळवणे टाळावे. कुणाशी हात मिळवले तर हात स्वच्छ धुवावे.

- आजार लोकांच्या संपर्कात येणे टाळा. खासकरून ज्यांना खोकला, ताप किंवा सर्दी-खोकला झालाय.

- घराबाहेर निघताना तोंडाला कापडाने झाकावे. शक्य असेल तर तोंडावर मास्क लावा.

टॅग्स :corona virusकोरोनाHealth Tipsहेल्थ टिप्सchinaचीन