International yoga day 2020: आजाारांचं कंबरडं मोडतील योगासनं; रोगप्रतिकारकशक्ती वाढेल वेगाने

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 09:51 AM2020-06-21T09:51:03+5:302020-06-21T11:50:32+5:30

कोरोना काळात आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याासाठी तसंच जीवघेण्या आजारांपासून बचावाासाठी दररोज स्वतःसाठी २० ते ३० मिनिटं वेळ काढून योगा करायलाच हवा.  

International yoga day 2020: Yoga will help to protect against major diseases | International yoga day 2020: आजाारांचं कंबरडं मोडतील योगासनं; रोगप्रतिकारकशक्ती वाढेल वेगाने

International yoga day 2020: आजाारांचं कंबरडं मोडतील योगासनं; रोगप्रतिकारकशक्ती वाढेल वेगाने

Next

(image credit_ mens health, fashion beans)

आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी २१ जूनला संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. या दिवसांची खास संकल्पना योगा विथ फॅमिली अशी असते. योगामुळे शरीर  दीर्घकाळ चांगले राहू शकते. आज आम्ही तुम्हाला काही खास योगा प्रकार आणि त्याचे फायदे सांगणार आहोत. कोरोना काळात आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याासाठी तसंच जीवघेण्या आजारांपासून बचावाासाठी दररोज स्वतःसाठी २० ते ३० मिनिटं वेळ काढून योगा करायलाच हवा.  जाणून घ्या योगा प्रकार केल्याने तुम्ही कोणत्या आजारांपासून लांब राहू शकता. 

योग करने से दूर होते हैं ये 5 रोग, लॉकडाउन में फायदा डबल

लठ्ठपणा

योगा केल्याने अनेक आजारांपासून लांब राहता येतं. जर तुम्ही नियमित योगासनं करत असाल तर वजन वाढण्याची शक्यता कमी असते. तसंच शरीराचा आकार बेढब झाला असेल तर तुम्ही अतिरिक्त वाढलेली चरबी नियंत्रणात आणण्यासाठी योगा करू शकता. कारण लठ्ठपणामुळे तुम्हाला इतरही आजारांचा सामना करावा लागू शकतो. 

डायबिटीस

डायबिटीसची समस्या एकदा उद्भवल्यास नेहमी व्यक्तीसोबत राहते. वेळोवेळी औषध घेऊन आपल्याला शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवावं लागतं. पण योगाच्या मदतीने तुम्ही रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवू शकता.  सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्यांपैकी डायबिटीज आणि लठ्ठपणाचे शिकार असलेल्या लोकांचे प्रमाण जास्त आहे. 

दमा

दम्याच्या त्रास असलेल्या लोकांसाठी योगा करणं परिणामकारक ठरतं.  योगा केल्याने श्वासांसंबंधी समस्यापासून सुटका मिळू शकते. कारण योगा केल्यानं फुफ्फुसांपर्यंत ताजी हवा पोहोचते. त्यामुळे तुम्ही आजारांपासून लांब राहू शकतात. कोरोनाचं संक्रमण फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्यास रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. 

हायपरटेंशन 

हाय ब्लड प्रेशरमुळे हृदयाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. योगा आणि ध्यान करून तुम्ही हायपरटेंशनच्या आजारापासून दूरत राहू शकता. सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीत अनेकांना या आजाराचा सामना करावा लागतो. 

मायग्रेन

अनेकांना मायग्रेनची समस्या उद्भवते. तरूणांमध्येही ही समस्या उद्भवण्याचं प्रमाण जास्त असते. मेंदूपर्यंत योग्य प्रमाणात रक्तपुरवठा न  झाल्याने मायग्रेनची समस्या उद्भवते.  योगा केल्याने संपूर्ण शरीरात रक्तपुरवठा व्यवस्थित राहतो. त्यामुळे अशा समस्या उद्भवत नाहीत. 
 

CoronaVirus News : कोरोना साथीने घेतले नवे धोकादायक वळण, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

Coronavirus: कोरोनावरील औषधाला DCGI ची मान्यता; १०३ रुपयांच्या 'या' गोळीनं रुग्ण बरे होणार!

Web Title: International yoga day 2020: Yoga will help to protect against major diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.