शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेस्ट कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी करा 'हे' उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 16:16 IST

Breast Care Tips : जगभरातील महिलांना होणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. तसेच भारतातही ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे.

(image credit- Medscap)जगभरातील महिलांना होणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. तसेच भारतातही ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. ग्रामीण भागातील स्त्रीया या संबंधी आजारांची तपासणी करण्यासाठी पुढाकार  घेत  नाही. त्यामुळे योग्य निदान न झाल्याने कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढत आहे. बदलत्या जीवनशैलीत आहार घेण्याच्या पध्दतीत फार बदल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया ब्रेस्ट कॅन्सरपासून बचाव करायचा असेल. तर कोणत्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.

ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं

जर  स्त्रीयांना स्तनात वेदना होत असतील.  तसेच अचानक मुलायम होत असतील. तर दुर्लक्ष करू नका. 

खाज येणे, वेदना  जळजळ होत असेल तर हेही एक कर्करोगाचे लक्षण  आहे. निप्पलमधून पांढरा द्रव निघणे : यामधून पांढरा द्रव किंवा इतर रंगाचा येणे किंवा रक्त येणे हे स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत.

भूक न लागणे, स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवणे ही लक्षणं सुध्दा धोकादायक ठरतात.

ज्या महिलांचा मासिक पाळी बंद झाली असेल त्यांनी महिन्याच्या एका ठराविक तारखेला ब्रेस्ट एक्झॅमिनेशन करणे आवश्यक आहे. जर स्तनामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ, किंवा सूज आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.  

 ब्रेस्ट कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी या  गोष्टीं करा 

आहारात मिठाचं प्रमाण कमी करा. रोज ताजं आणि सकस अन्न खा.  नियमित  व्यायाम करा. व्यायामामध्ये नियमित योगासनं करा. कडक उन्हापासून स्वतःचा बचाव स्वतःच करा. जास्त घाम येत असल्यास दिवसातून कमीतकमी दोन वेळा अंघोळ करा. घट्ट अंर्तवस्त्र घालू नका . जर  जास्त घट्ट कपडे घातल्यास  रक्त पुरवठा कमी होण्याची शक्यता असते.मद्यप्राशन करणे हे  स्तनांच्या कॅन्सरचे कारण ठरू शकतं. साखरेचं अतीसेवन  मधुमेह, लठ्ठपणा यांसारखे आजार उद्भवतात. त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो.

टॅग्स :cancerकर्करोगHealth Tipsहेल्थ टिप्स