शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जेवणाआधीच्या 'या' एका सवयीमुळे तुमचं वजन होईल कमी, जाणून घ्या ट्रिक...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 12:03 IST

Weight Loss Tips : केवळ एक्सरसाईज करून किंवा धावल्याने वजन कमी होत नसतं. आज आम्ही तुम्हाला एक खास ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल. 

Weight Loss Tips : आजकाल कमी वयातच वजन वाढणं, पोट बाहेर येणं अशा अनेक समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहेत. अशात वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. यातून काहींना फायदा होतो तर काहींना नाही. कारण अनेकांना वजन कमी करण्यासाठीच्या काही खास गोष्टी माहीत नसतात. केवळ एक्सरसाईज करून किंवा धावल्याने वजन कमी होत नसतं. आज आम्ही तुम्हाला एक खास ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल. 

जेवणाआधीची तुमची एक छोटीशी सवय तुम्हाला वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. त्याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे याने आपल्या शरीराला कोणतंही नुकसान होणार नाही. चला जाणून घेऊ काय आहे ट्रिक...

काय आहे उपाय?

अमेरिकेतील प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट इलाना मुरस्टाइननुसार, जेवणाआधी साधारण एक ग्लास पाणी प्यायल्याने तुम्ही फिट राहू शकता. इलानानुसार काही रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, जेवणाआधी पाणी प्यायल्याने प्रमाणापेक्षा जास्त पदार्थ खाल्ले जात नाहीत. जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. 

खरंतर अनेकजण तहान लागण्याला भूकेच्या दृष्टीकोनातून बघतात. अशावेळी जेवण करताना पदार्थ खाण्याचं प्रमाण वाढतं, जे वजन वाढण्यास कारणीभूत ठरतं. त्यामुळे जेवणाआधी एक ग्लास पाणी पिणे तुमच्यासाठी फायद्याचं ठरु शकतं. 

आयुर्वेदातही याचा उल्लेख

आयुर्वेदात जेवणाआधी आणि जेवण झाल्यावर लगेच पाणी पिणे शरीरासाठी चांगलं नसल्याचं सांगितलं गेलं आहे. आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे की, असे केल्याने व्यक्तीची पचनक्रिया कमजोर होऊ शकते. पण याजागी जेवण करताना मधे पाणी पिणे योग्य सांगण्यात आलं आहे. 

आयुर्वेदानुसार, जेवण करताना मधून मधून एक-एक घोट पाणी प्यायला हवं. याने पदार्थ आणकी मुलायम होतो आणि ते पोटात पचन्यासाठीही सोपं जातं. सोबतच या पद्धतीने व्यक्ती जास्त जेवण करण्यापासूनही बचावतो. इतकेच नाही तर जास्त तेलकट किंवा मसालेदार भाज्या खाल्ल्या असतील तर यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांनाही रोखता येऊ शकतं. 

कसं पाणी प्यावं?

फार जास्त थंड किंवा फार जास्त गरम पाणी पिणे टाळावे, शरीरासाठी सामान्य तापमान असलेलं पाणी पिणे अधिक फायद्याचं असतं. याने तेल कमी केलं जातं आणि पदार्थ पचन्यासही मदत होते. इतकेच नाही तर याने फॅट बर्न होण्यासही मदत होते. जेवण केल्यावर लगेच ढसाढसा पाणी पिऊ नये. जेवण झाल्यावर साधारण अर्ध्या तासाने पाणी प्यावे.

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स