Coronavirus: Mankind to sale sputnik v in india israel will start trial of covid vaccine candidate brilife | भारतात 'ही' कंपनी रशियन लसीची विक्री करणार, इस्त्राईलच्या लसीच्या चाचणीलाही दिली मंजूरी

भारतात 'ही' कंपनी रशियन लसीची विक्री करणार, इस्त्राईलच्या लसीच्या चाचणीलाही दिली मंजूरी

स्वदेशी कोरोना लस विकसित होण्यासाठी जवळपास एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे.  त्याआधीच कोविड १९ ची रशियन स्पुटनिक- व्ही ही लस भारतात उपलब्ध होऊ शकते. दिल्लीतील मॅनकाईंड फार्मा कंपनीने RDIF शी करार केला आहे. याअंतर्गत भारतात लसीचे मार्केंटिंग आणि वितरण केलं जाणार आहे. दरम्यान किती क्षमतेने लसीचे डोज तयार केले जाणार आहेत, याबाबत माहिती स्पष्ट झालेली नाही. मॅनकाईंड व्यतिरिक्त डॉ. रेड्डी लॅबोरेटरीजनेही  लसीसाठी RDIF शी भागीदारी केली आहे. तर दुसरीकडे इस्त्राईलने आपल्या कोरोना लसीचे नाव ‘Brilife’ असं ठेवलं आहे. माणसांवर या लसीचे परिक्षण ऑक्टोबर महिन्याच्या शेवटापासून सुरू होईल. ऑगस्टमध्येच कोरोना लस तयार केल्याचा दावा इस्त्राईलने केला होता. 

शनिवारी डॉ रेड्डीज लॅबोरेटरीने दिलेल्या माहितीनुसार  ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने स्पुटनिक व्ही च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवागनी दिली आहे. मल्‍टी-रेंटर रँडमाइज्‍ड कंट्रोल या चाचणीत लस कितपत सुरक्षित आणि प्रभावी ठरते हे पाहिले जाणार आहे. ही लस गमलेया नॅशनल रिसर्च इंस्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी एंड मायक्रोबायोलॉजीने तयार केली आहे. स्पुटनिक व्ही जगातील सगळ्यात आधी तयार झालेली कोरोना लस आहे. 

इस्त्राईलची ही लस इंस्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल रिसर्च (IIBR) ने तयार केली आहे. IIBR चे डायरेक्टर जनरल यांनी दिलेल्या माहितीनुसार हिब्रू भाषेत ब्री या शब्दाचा अर्थ आरोग्य असा होतो. il म्हणजे इज्राईल आणि जीवन. या लसीचे मानवी परिक्षण दोन सेंटर्सवर होणार आहे. पहिल्या टप्प्यात १०० लोकांवर चाचणी करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात १ हजार लोकांवर परिक्षण करण्यात येणार आहे. भारतात कोरोना लसीची उपलब्धता आणि वितरण यांवर जोरदार तयारी सरकारकडून सुरू आहे. काळजी वाढली! २ वर्षांपर्यंत कोरोना पाठ सोडणार नाही; WHO तज्ज्ञांनी दिला 'या' ३ गोष्टींचा सल्ला

कोरोना से तबाही

PM मोदींनी ग्रँड चॅलेंजेस मीटिंग्सचे उद्घाटन करताना याबाबत  माहिती दिली होती. त्यांनी सांगितले की, लसीच्या उत्पादनात भारत सगळ्यात पुढे आहे. लसीचा पुरवठा आणि वितरण प्रणाली तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भारतात लसीचे उत्पादन आणि वितरणाबाबत एक स्ट्रीमलाईन तयार करण्यासाठी खास कमिटी नेमण्यात आली आहे. याद्वारे जगभरातील लसींच्या विकास प्रक्रियेवर लक्ष ठेवले जात आहे. 'या' १० कारणांमुळे थंडीच्या दिवसात वाढू शकतो कोरोनाचा धोका, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

धोका अजूनही टळलेला नाही

कोरोनाच्या माहामारीचा ग्राफ खाली जाणं म्हणजेच देशात सर्वकाही व्यवस्थित सुरू आहे, असं अजिबात नाही. लोकांच्या लहानात लहान चुकांमुळे पुन्हा हा ग्राफ वर जाऊ शकतो. युरोपमध्ये पुन्हा रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. फ्रांसमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या स्थितीपासून बचावासाठी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. 

पॉझिटिव्हिटी रेट केरळमध्ये मागच्या सात दिवसांमध्ये १६ टक्के आणि महाराष्ट्रात १३. ८ टक्के आहे. राजस्थानमध्ये ११.३ टक्के तर पश्चिम बंगालमध्ये ८.६ टक्के आहे. आतापर्यंत ही स्थिती गंभीर असल्याचे मानलं जात आहे. केरळमध्ये प्रति मिलियन एक लाखांपेक्षा जास्त कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यानंतर पॉझिटीव्हिटी रेट वाढलेला दिसून आला, हे फारचं चिंताजनक आहे. इतर राज्यांमध्येही लोक सावधगिरी बाळगतील तेव्हा पॉझिटिव्हिटी रेट कमी होईल. उपवास करूनही वाढवू शकता रोगप्रतिकारकशक्ती; फक्त 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश

मागच्या ४५ दिवसात देशात आठ लाख नवीन कोरोना रुग्ण सापडले असून एक चांगला संकेत मिळत आहे. राष्ट्रीय स्तरावर पाहिल्यास सुधारणा झालेली दिसून येत आहे. पण केरळ, मध्यप्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये अजूनही धोका कमी झालेला नाही. या राज्यातून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर येत आहे. म्हणून लोकांनी सावध राहायला हवं.  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus: Mankind to sale sputnik v in india israel will start trial of covid vaccine candidate brilife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.