उपवास करूनही वाढवू शकता रोगप्रतिकारकशक्ती; फक्त 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश

By Manali.bagul | Published: October 18, 2020 10:48 AM2020-10-18T10:48:00+5:302020-10-18T11:04:54+5:30

Benefits of Fasting in Marathi : नवरात्रीत रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Health Tips: Fasting can also boost the immune system include foods in your diet | उपवास करूनही वाढवू शकता रोगप्रतिकारकशक्ती; फक्त 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश

उपवास करूनही वाढवू शकता रोगप्रतिकारकशक्ती; फक्त 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश

googlenewsNext

(Image Credit- Taste Of Home,tatanutricorner)

कोरोनाच्या माहामारीत आता शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. अनेकजण नवरात्रीचे उपवास करण्यासाठी  उत्सुक असतात. हे उपवास शरीरासाठी फायदेशीर ठरत असल्याचे म्हटले जाते. कारण यामुळे शरीराला अनेक गुणकारी फायदे मिळतात. पचनक्रिया सुरळीत होऊन शरीराची कार्यक्षमता वाढते. याशिवाय मसालेदार आणि फास्ट फूडपासून लांब राहिल्याने रोगप्रतिकारकशक्तीही चांगली राहते. नवरात्रीत रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

साबुदाने की खिचड़ी

नवरात्रीच्या दिवसात पौष्टिक आहार घ्या, हिरव्या भाज्या, फळांचे सेवन जास्तीत जास्त करा. यामुळे तुम्हाला फक्त फायबर्स मिळतील असं नाही तर शरीर हायड्रेट राहण्यासोबतच रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहील. 
२ बदाम,  १ आक्रोड, ५ मनूके रोज रात्री भिजवून सकाळी खा.

सकाळी पूजा झाल्यानंतर पाणी प्यायल्यानंतर एक कप बदामाचा किस घातलेलंं दूध किंवा चहाचे सेवन करा. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत  होईल. 

एक कप दुधात केळं किंवा अॅपल मिक्स करून त्याचा मिक्स शेक तयार करून त्याचे सेवन करा. घरच्याघरी असा ज्यूस तयार करून प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. केळ्याऐवजी तुम्ही चिकूचा सुद्धा आहारात समावेश करू शकता. 

मोसंबी, संत्री, लिंबू यांसारख्या आंबट फळांचे सेवन करा.  अशा फळांमध्ये व्हिटामीन सी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. 

दूपारच्या फराळात शेंगदाणे, नारळ पाण्याचा समावेश असावा. यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना दूर ठेवण्यास मदत होते. याशिवाय तुम्ही फळांचा रस किंवा लिंबू पाण्याचे सेवनही करू शकता. 

संध्याकाळी साबुदाण्याची खिचडी किंवा खीरीचे सेवन करायला हवे. डॉक्टरर्स सुद्धा रुग्णांना जेवणात साबुदाण्याचा समावेश करण्याचा सल्ला देतात. भय इथले संपत नाही! 'या' देशात पसरली कोरोनाची दुसरी लाट, लागू केली आणीबाणी

रात्रीच्या जेवणाआधी किंवा जेवणानंतर व्हेजिटेबल सूप पिण्याची सवय ठेवा. सूप प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. पोट साफ न होणं, गॅस होणं अशा समस्यांचा सामना करावा लागत नाही. जास्त उपवास केल्याने होऊ शकतो 'असा' त्रास, जाणून घ्या उपवास करूनही कसं निरोगी राहायचं?

Web Title: Health Tips: Fasting can also boost the immune system include foods in your diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.