Health Tips : Fast change come body know ways avoid Uric acid increase | जास्त उपवास केल्याने होऊ शकतो 'असा' त्रास, जाणून घ्या उपवास करूनही कसं निरोगी राहायचं?

जास्त उपवास केल्याने होऊ शकतो 'असा' त्रास, जाणून घ्या उपवास करूनही कसं निरोगी राहायचं?

 नवरात्रीचा सण सुरू व्हायला काही दिवसंच उरले आहेत. घरोघरच्या गृहीणी घर, देव्हारा साफ सफाई करण्यात व्यस्त असतील. यंदा कोरोनाच्या पाश्वभूमीवर दांडियांचा कार्यक्रम पूर्णपणे बंद असला तरी घरच्याघरी मात्र लोक मोठ्या उत्साहाने देवीची पूजाअर्चा करून नवरास्त्रोत्सव साजरा करतील. देवीचा सण म्हटलं की उपासतपास आलेच. अनेकांच्या घरी वर्षानुवर्षांपासून उपवास केले जातात तर काहीजण आवड म्हणून उपवास करतात. पण अनेकदा नकळतपणे जास्त उपाशी राहिल्याने शरीरावर परिणाम होतो. आज आम्ही उपवास करत असताना निरोगी कसं  राहावं यासाठी काही टिप्स देणार आहेत. 

जास्त प्रमाणात प्रोटीन्स असलेल्या पदार्थांचा आहारात घेतल्यास युरिक एसिड्चं प्रमाण वाढतं.  साधारणपणे शरीरातील युरिक एसिड मुत्राद्वारे बाहेर पडत असतं. पण युरिक एसिड मुत्राद्वारे योग्य प्रमाणात बाहेर पडलं नाही तर शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.  जे लोक वारंवार उपवास करतात. त्यांच्या शरीरात  युरिक एसिडचं प्रमाण जास्त असतं. याशिवाय शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत असतात. त्यामुळे स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी खाण्यापिण्याच्या बाबतीत काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. युरीक अ‍ॅसिडची समस्या म्हणजेच सांधेदुखी हा त्रास आजकाल जवळपास सर्वांना होत असल्याचे दिसत आहे. साधारण पणे ३० वर्ष वयानंतर लोकांना हा आजार होतो. 

शरीरातील युरिक एसिड का वाढतं?

हाय प्रोटीन्स फुड म्हणजेच कोबी, टॉमेटो, मास जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील युरिक एसिडचं प्रमाण वाढतं. गरजेपेक्षा जास्त डायटिंग केल्याने, जास्त उपवास केल्याने शरीरातील उर्जा कमी होते त्यामुळे युरिक एसिडचं प्रमाण वाढतं. अनेकदा किडनी खराब असल्यामुळे शरीरातील युरिक एसिड योग्य प्रमाणात बाहेर पडत नाही. त्यामुळे शरीरातील युरिक एसिडचं प्रमाण वाढतं. मधुमेहामुळेही शरीरातील युरिक एसिडचं प्रमाण वाढतं. 

शरीरातील युरिक एसिड नियंत्रणात ठेवण्याचे  उपाय

जास्तीत जास्त पाणी प्या. दिवसातून १० ते १२ ग्लास पाणी प्यायला हवे.

प्रोटिन्सयुक्त पदार्थांचे सेवन प्रमाणापेक्षा जास्त करू नका. 

संत्रीमध्ये व्हिटामीन सी, पोटॅशियम, फ्लेवोनॉइड्स, असते. त्यामुळे शरीरातील युरिक एसिड बाहेर निघण्यास मदत होते. शरीरातील युरिक एसिडची पातळी नियंत्रणात राहते. 

युरिक एसिडचं शरीरातील प्रमाण नियंत्रणात ठेवायचं असेल तर  चटपटीत पदार्थ, भाजलेले पदार्थ, जंक फूड, सोया मिल्क अशा पदार्थांचे सेवन टाळा. 

युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण नैसर्गिकरित्या सुद्धा कमी केलं जाऊ शकतं. त्यासाठी प्यूरिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश कमी करा. जेणेकरून पचनक्रिया व्यवस्थित राहील. भय इथले संपत नाही! 'या' देशात पसरली कोरोनाची दुसरी लाट, लागू केली आणीबाणी

आहारात फायबर्सयुक्त पदार्थाचा समावेश करावा. चांगली झोप घेणं गरजेचं आहे. झोपेच्या २ ते ३ तास आधी स्क्रिनपासून लांब राहावे. रोज नियमीत व्यायाम करून तुम्ही या त्रासापासून आपली सुटका करू शकता. शारीरिकदृष्या बळकट राहण्यासाठी रोज व्यायाम करा. CoronaVirus  : हिवाळ्यात कोरोना विषाणूचा धोका वाढणार? सुपर कम्प्यूटरने केला खुलासा

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Health Tips : Fast change come body know ways avoid Uric acid increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.