काही लोकांना १० वर्षे आधीच होऊ शकतो कॅन्सर? टाटा मेमोरियलचा अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 06:00 IST2025-11-30T05:59:29+5:302025-11-30T06:00:28+5:30

भारतातील काही तंबाखू चघळणाऱ्या व्यक्तींमध्ये इतरांच्या तुलनेत सुमारे १० वर्षे आधी तोंडाचा कर्करोग होण्यास काही विशिष्ट जनुक-जोखीम घटक जबाबदार असू शकतात.

Can some people get cancer 10 years earlier? Tata Memorial study | काही लोकांना १० वर्षे आधीच होऊ शकतो कॅन्सर? टाटा मेमोरियलचा अभ्यास

काही लोकांना १० वर्षे आधीच होऊ शकतो कॅन्सर? टाटा मेमोरियलचा अभ्यास

मुंबई : मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत येणाऱ्या खारघर येथील ऍक्ट्रेक रुग्णालयातील सेंटर फॉर कॅन्सर एक एपिडेमियोलॉजी विभागाद्वारे महत्त्वपूर्ण जनुकांशी (जीनोम-वाइड असोसिएशन स्टडी) अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासानुसार भारतातील काही तंबाखू चघळणाऱ्या व्यक्तींमध्ये इतरांच्या तुलनेत सुमारे १० वर्षे आधी तोंडाचा कर्करोग होण्यास काही विशिष्ट जनुक-जोखीम घटक जबाबदार असू शकतात.

द लॅन्सेट डिस्कव्हरी सायन्सचा भाग असलेल्या ईबायोमेडिसिन नियतकालिकात हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. या अभ्यासात विविध भौगोलिक प्रदेशांमधील २,३२५ निरोगींशी बक्कल म्यूकोसा कर्करोगाच्या २,१६० प्रकरणांची तुलना केली. 

त्यानुसार उच्च आनुवंशिक संवेदनशीलता दर्शविणारे असलेल्या तंबाखू खाणाऱ्यांना कमी पॉलीजेनिक रिस्क स्कोअर असलेल्यांपेक्षा १० वर्षे आधी मुखाचा कर्करोग झाला. भारतात, तोंडाच्या कर्करोगाचे १,४१,३४२ रुग्ण आहेत ज्यांचे वयानुसार प्रमाणित दर १,००,००० लोकांमागे १०.० आहे. 

काही राज्यांमध्ये हा दर २५ ते ३३ पर्यंत आहे. टाटा मेमोरियलचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी कर्करोग विकासात आनुवंशिक संवेदनशीलता समजून घेण्यासाठी अशा अभ्यासांचे महत्त्व अधोरेखित केले.

तंबाखू न खाणाऱ्यांच्या तुलनेत २६ पट अधिक धोका

ऍक्टरेकचे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी यावर भर दिला की तंबाखू खाणे हे तोंडाच्या कर्करोगासाठी एक महत्त्वाचा धोकादायक घटक आहे. तंबाखू खाणाऱ्यांमध्ये तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका तंबाखू न वापरणाऱ्यांच्या तुलनेत २६ पट जास्त असतो. आनुवंशिक संवेदनशीलता मार्करमुळे हा धोका दुप्पट होतो.

भारतात तोंडाच्या कर्करोगाचे ओझे किती आहे ?

जगभरातील तोंडाच्या कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी सुमारे एकतृतीयांश रुग्ण भारतात आढळतात. भारतात हा कर्करोग पुरुषांमध्ये आढळणाऱ्या तीन प्रमुख कर्करोगांपैकी एक असून, महिलांमध्येही सामान्यपणे दिसतो.

तंबाखू खाण्याचे प्रकार आणि सुपारीचे सेवन हे या रोगाचे प्रमुख कारण मानले जाते. अनेक राज्यांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचे वय-समायोजित दर २५ ते ३३ प्रति १,००,००० लोकसंख्या इतके आहेत.

Web Title : तंबाकू चबाने वालों को 10 साल पहले हो सकता है मुख कैंसर: अध्ययन

Web Summary : टाटा मेमोरियल के अध्ययन से पता चला है कि तंबाकू चबाने वालों में आनुवंशिक कारकों से मुख कैंसर पहले हो सकता है। उच्च आनुवंशिक संवेदनशीलता वाले लोगों को दस साल पहले कैंसर हो गया। भारत में मुख कैंसर का बोझ ज़्यादा है, जो तंबाकू और सुपारी से जुड़ा है।

Web Title : Oral Cancer May Strike Tobacco Chewers 10 Years Earlier: Study

Web Summary : Tata Memorial study reveals genetic factors may cause earlier oral cancer in tobacco chewers. Those with high genetic susceptibility developed cancer ten years sooner. India has a significant oral cancer burden, linked to tobacco use and betel nut consumption.