शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
6
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
7
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
8
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
9
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
10
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
11
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
12
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
13
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
14
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
15
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
16
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
17
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
18
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
19
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
20
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
Daily Top 2Weekly Top 5

लिंबू आणि कापराच्या मिश्रणाने दूर होतील या ५ समस्या, जाणून घ्या कसा कराल वापर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 15:50 IST

Lemon With Camphor benefits : लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं जे वायरल ते फंगल इन्फेक्शनपासून बचाव करतं. तर कापरामधील तत्वांमुळे वेदना, सूज या समस्या दूर करतात.

Lemon With Camphor benefits : लिंबू आणि कापराचं मिश्रण आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत करतं. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं जे वायरल ते फंगल इन्फेक्शनपासून बचाव करतं. तर कापरामधील तत्वांमुळे वेदना, सूज या समस्या दूर करतात. अशात या दोन्ही गोष्टींच्या मिश्रणाचे आरोग्याला काय काय फायदे मिळतात तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

दाताचं दुखणं होईल दूर

लिंबू आणि कापूर एकत्र करून लावल्याने दात दुखण्याची समस्या दूर करता येते. तसेच याने दातांना किडही लागत नाही. यासाठी लिंबाच्या रसात चिमूटभर कापूर टाकून दातांवर लावा. त्यानंतर पाण्याने गुपळा करा. 

पोटासंबंधी समस्या

लिंबू आणि कापराचं मिश्रण लावल्याने पोटासंबंधी समस्या दूर केल्या जाऊ शकतात. याने पोटदुखी, अपचन यांसारख्या समस्या कमी केल्या जाऊ शकतात. याचा वापर करण्यासाठी लिंबाच्या रसात कापूर, ओवा आणि पदीन्याचा रस पाण्यात टाकून सेवन करा. याने फायदा मिळेल.

पायांची स्वच्छता

पायांची टॅनिंग दूर करण्यासाठी लिंबू आणि कापराचं मिश्रण फायदेशीर ठरतं. यासाठी एका टबमध्ये कोमट पाणी घ्या. त्यात लिंबाचा रस आणि कापूर टाकून या पाण्यात काही वेळ पाय टाकून बसा. नंतर साध्या पाण्याने पाय धुवावे. काही वेळ हा उपाय केल्याने पायांवरील टॅनिंग, पायांवरील मळ, माती दूर होईल.

केसगळती थांबेल

लिंबू आणि कापराचं मिश्रण केसांवर लावल्याने कोंड्याची समस्या दूर करता येते. यात अ‍ॅंटी-डॅंड्रफ आणि अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. ज्यामुळे डोक्याच्या त्वचेलाही इन्फेक्शन होणार नाही. तसेच केसगळतीची समस्याही दूर होईल. 

वजन होईल कमी

शरीराचं वाढलेलं वजन वजन कमी करण्यासाठी लिंबाचा रस आणि कापराचं वापर करू शकता. याने तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट होईल, ज्यामुळे शरीरातील कॅलरी बर्न होण्याचा वेग वाढेल. याचा तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल.
 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य