शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

जेवण केल्यावर महिलेच्या गालावर यायची सूज, रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी कपाळावर मारून घेतला हात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 13:45 IST

डॉक्टरांसमोर कधी-कधी अशा केसेस येतात की, ते सुद्धा या केसेस बघून हैराण होतात. अशीच एक हैराण करणारी घटना इराकमधून समोर आली आहे.

डॉक्टरांसमोर कधी-कधी अशा केसेस येतात की, ते सुद्धा या केसेस बघून हैराण होतात. अशीच एक हैराण करणारी घटना इराकमधून समोर आली आहे. इथे एका ६६ वर्षीय महिलेची समस्या डॉक्टरांसाठी एक गंभीर समस्या बनली आहे. ही महिला जेव्हाही जेवण करते, तेव्हा तिचे गाल सूजतात. जेव्हा यासाठी तिची टेस्ट करण्यात तेव्हा समोर आलेला रिपोर्ट पाहून डॉक्टरही हैराण झाले. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेचे पॅरोटिड ग्लेंड म्हणजेच लाळ ग्रंथींमध्ये स्टोन होते. धक्कादायक बाब म्हणजे एक-दोन नाही तिच्या ग्रंथींमध्ये तब्बल ५३ स्टोन होते. या स्टोनमुळे तिने काहीही खाल्ल्यावर तिच्या गालांमध्ये सूज येत होती. 

आता महिलेच्या लाळ ग्रंथींमधून स्टोन काढण्याची वेळ होती. पण इराकच्या डॉक्टरांसाठी हे सोपं काम नव्हतं. त्यांनी महिलेला सांगितले की, तिच्या चेहऱ्यावर कोणतीही खून पाडल्याशिवाय स्टोन काढणे शक्य नाही. पण महिला यासाठी तयार नव्हती. यासाठी ती भारतात आली.

दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलमध्ये महिलेची सर्जरी करण्यात आली आणि तिच्या लाळ ग्रंथींमधून सर्वच ५३ स्टोन काढण्यात आलेत. डॉक्टरांनुसार, ही जगातली पहिली अशी केस आहे. ज्यात एखाद्या महिलेच्या लाळ ग्रंथींमधून स्टोन आढळले आणि ते काढण्यात आलेत.गंगाराम हॉस्पिटलमधील डॉक्टर वरूण राय यांनी सांगितले की, हे फारच अवघड काम होतं. तिच्या चेहऱ्यावर कोणतंही निशान न पडू देता सहा सेमी लांब आणि ३-४ सेमी रूंद ग्रंथीतून स्टोन काढायचे होते. तब्बल दोन तासांच्या सर्जरीनंतर तिच्या लाळ ग्रंथींमधून ५३ स्टोन काढण्यात आले.  

(Image Credit : AmarUjala)

लाळ ग्रंथी तोंडातील असा अवयव आहे, ज्यातून लाळ तयार होते. या ग्रंथी लाळ रिलीज करणे आणि पचनक्रियेत मदत करण्याचं काम करतात. यात पाण्याचं प्रमाण ९८ टक्के असतं. लाळ ग्रंथी २४ तासात जवळपास १ ते १.५ लिटर लाळ रिलीज करते. याने तोंडात ओलावा राहतो आणि तोंड स्वच्छ राहतं. 

टॅग्स :Healthआरोग्यJara hatkeजरा हटके