शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लूचा ३९वा बळी

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

स्वाईन फ्लूचा ३९वा बळी

स्वाईन फ्लूचा ३९वा बळी
-चिमुरड्यांमध्ये वाढतोय आजार : स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या १८८
(स्वाईन फ्लूचा लोगो घ्यावा)

नागपूर : स्वाईन फ्लू बळीची संख्या वाढतच आहे. शुक्रवारी आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. आज मिळालेल्या स्वाईन फ्लूच्या अहवालात तीन महिन्यांच्या बाळांसह पाच वर्षाच्या आतील चार बालकांना स्वाईन असल्याचे निष्पन्न झाले आहे. चिमुरड्यांमध्ये स्वाईन फ्लूची लागण वाढल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण आहे.
सुनील कोटकर (४२) रा. विश्वकर्मानगर, असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील कोटकर हे एका खासगी इस्पितळात उपचार घेत होते. एआरएल लॅबमधून त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह येताच त्यांना १४ फेब्रुवारी रोजी मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. सुरुवातीपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. आज दुपारी १ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोटकर यांच्या मृत्यूने बळीची संख्या ३९ झाली आहे.
मेडिकलने पाठविलेल्या २१ संशयित रुग्णांचे नमुन्यांचा अहवाल शुक्रवारी मिळाला. यात सात रुग्णांना स्वाईन फ्लू असल्याचे निष्पन्न झाले. यात तीन महिने, दोन वर्षे, तीन वर्षे आणि चार वर्षांच्या चिमुकल्यांचा समावेश आहे. तर १७, २५ व ४५ वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. हे रुग्ण, नागपूर, कळमेश्वर, साकोली आणि मध्यप्रदेशातील आहे. मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात सध्याच्या स्थितीत चार पॉझिटीव्ह तर १६ संशयित रुग्ण उपचार घेत आहेत. स्वाईन फ्लूच्या बालरोग वॉर्डात सहा पॉझिटीव्ह तर तीन संशयित रुग्ण उपचार घेत आहेत.
-विभागात १८८ रुग्ण
शहरात आतापर्यंत स्वाईन फ्लूचे १३३ रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. या शिवाय नरखेड येथून दोन, उमरेड तीन, काटोल एक व कामठी एक असे मिळून आठ रुग्ण, इतर जिल्ह्यातील १६, अकोला येथील तीन, मध्यप्रदेशातील १६, आंध्रप्रदेशातील एक असे मिळून नागपूर विभागात स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या १८८ झाली आहे.
-शहरात २२ रुग्णांचा मृत्यू
शहरात आतापर्यंत २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीणमध्ये पाच, इतर जिल्ह्यामंध्ये सहा, नागपूर विभागाच्या बाहेरून येथे उपचारासाठी आलेली परंतु मृत्यू झालेली दोन, इतर राज्यातील चार असे एकूण ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.