शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या बदल्यांसाठी जि.प.ला लगीनघाई

By admin | Updated: May 24, 2014 23:43 IST

बालकांना मोफत व शक्तीचे शिक्षण देण्याचा अधिनियम शासनाने सन २00९ मध्ये काढला. यासंदर्भात काढलेल्या शासन निर्णयानुसार पटसंख्या निश्‍चितीनंतर शिक्षकांचे समायोजन करायचे होते.

गोंदिया : बालकांना मोफत व शक्तीचे शिक्षण देण्याचा अधिनियम शासनाने सन २00९ मध्ये काढला. यासंदर्भात काढलेल्या शासन निर्णयानुसार पटसंख्या निश्‍चितीनंतर शिक्षकांचे समायोजन करायचे होते. व त्यानंतर शिक्षकांच्या बदल्या करायच्या होत्या. या संदर्भात १५ मे २0१४ च्या शासन परिपत्रकानुसार शिक्षकांच्या बदल्या बाबत यथावकाश निर्णय घ्यावा, असे स्पष्ट असताना जि.प.च्या शिक्षण विभागाने शिक्षकांना मोबाईलव्दारे संदेश पाठवून २१ मे ला कार्यशाळा असल्याचे निर्देश दिले. यामुळे जि.प. ला शिक्षकांच्या बदल्यांबाबत लगीनघाई असल्याचे निदर्शनात येत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे.

जि.प.ने आयोजित या कार्यशाळेला शेकडो शिक्षक उपस्थित झाले होते. जिल्ह्यात आधी आरटीई लावून शिक्षक व विद्यार्थी संख्येनुसार उच्चश्रेणी मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक व सहायक शिक्षकांचे समायोजन करायचे असते. समायोजन करताना शिक्षकांची कार्यशाळा घेऊन त्यांच्या इच्छेनुसार शाळा व पंचायत समित्याही बदल करता येतील. यामुळे समायोजनाबरोबर बदल्यांचा हेतु साध्य करता येईल. मात्र बदल्याचा नावावर संदेश पाठवून सुट्यामध्ये दुसर्‍या गावी किंवा दुसर्‍या जिल्ह्यामध्ये वास्तव्यास असलेल्या शिक्षकांना बोलावण्यात आल्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागला. गोंदिया जिल्हा परिषदेने शिक्षणाचा अधिकार अधिनियम लक्षात ठेवून शिक्षकांचे समायोजन करताना शिक्षकांना विश्‍वासात घेण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज दिक्षीत, कार्याध्यक्ष शेषराव येडेकर, सरचिटणीस एल.यु. खोब्रागडे, उपाध्यक्ष किशोर डोंगरवार, जिल्हा संघटक सुरेश रहांगडाले, कोषाध्यक्ष एस.सी. पारधी, पी.आर. पारधी, अरुण दीप, सुनील बावनकर, जी.आर. मेश्राम, नीलकंठ बिसेन, संदीप तिडके, जी.आर. बांते, सतीश दमाहे, ओ.जे. वासनिक, डी.आर. जिभकाटे, के.के. नेवारे, नरेश बडवाईक, डब्ल्यू.बी. भानारकर, वाय.डी. चव्हाण, टेलन बंसोड यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)