शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मजुरी करता-करता ‘तो’ झाला मालक

By admin | Updated: January 11, 2015 22:53 IST

अनेक जण नशिबाला दोष देत आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊन त्यात दिवस काढतात. पण आपले नशिब आपल्या हाताने घडवून पाहिलेली स्वप्ने पूर्ण करणारे युवकही दुनियेत कमी नाहीत.

युवा दिन विशेष : कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलून परिस्थितीवर मातएच.के.फुंडे - कालीमाटीअनेक जण नशिबाला दोष देत आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊन त्यात दिवस काढतात. पण आपले नशिब आपल्या हाताने घडवून पाहिलेली स्वप्ने पूर्ण करणारे युवकही दुनियेत कमी नाहीत. आमगाव तालुक्यातील किकरीपार या छोट्या गावातील संजय सीताराम दोनोडे (२८) हा युवकही अशाच युवकांपैकी एक आहे. वयाच्या १७ व्या वर्षापासून कामाला लागलेला संजय गुरे चारता-चारता आणि मजुरी करून कुटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडून आज एका दुकानाचा आणि वृत्तपत्र एजन्सीचा मालक झाला आहे.घरची परिस्थिती बेताचीच असल्याने संजयला अवघे सहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर कुटुंबाला हातभार लावण्यासाठी घराबाहेर पडावे लागले. स्वत:ला जास्त शिकता आले नाही तरी संजयने लहान भाऊ अजय आणि बहिणीच्या शिक्षणासाठी काही कमी पडू दिले नाही. सुरुवातीला गावात गुरे चारण्याचे काम केल्यानंतर तो नागपूर येथे मजुरीसाठी गेला. तिथल्या मिळकतीतून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असला तरी त्यात त्याचे समाधान नव्हते. काहीतरी दुसरे करून मजूर म्हणून न जगता मालक म्हणून जगण्याची उमेद त्याच्यात कायम होती. आमगाव येथे तो आपल्या वयाच्या १७ व्या वर्षापासून वृत्तपत्र विक्रीचे काम करीत होता. मजुरकामातून जमविलेल्या थोड्याथोडक्या पैशाचा सदुपयोग करीत २००८ मध्ये संजयने वृत्तपत्रांची एजन्सी घेतली. त्यावेळी त्याला मासिक उत्पन्न अवघे १८०० रुपये मिळायचे. पण संजयने ग्राहकांशी व्यवहारिक संबंध न ठेवता कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध जपून आपल्या व्यवसायाला अधिक वाढविले. पहाटे पाच वाजतापासून आमगावच्या गल्लोगल्लीत विविध वर्तमानपत्रे पोहोचविणाऱ्या संजयने २०१० मध्ये तालुक्यातील काही एजंसी विकत घेतल्या. यातून तो महिन्याकाठी ३५ हजार रुपये कमवितो. याच व्यवसायाच्या माध्यमातून आमगाव येथे जनरल स्टोअर्स टाकले. पहाटेपासून पेपरविक्रीच्या व्यवसायाकडे लक्ष देणारा संजय दिवसा आपले दुकान सांभाळतो.परिस्थितीशी जुळवून घेत कुढत बसण्याऐवजी काहीतरी करण्याची जिद्द ठेवली तर ती नक्कीच पूर्ण होते हेच संजयच्या या प्रवासातून दिसून येते. बेरोजगारीने बरबटलेल्या समाजासाठी संजयचा हा स्वयंरोजगार निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे. परिस्थितीशी दोन हात करून यशाचे शिखर गाठणारा संजय हा वास्तवीक जीवनातला हीरो ठरला आहे.