कोहलगाव ग्रामवासी मदतीसाठी सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 05:00 AM2020-04-07T05:00:00+5:302020-04-07T05:00:46+5:30

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देश आर्थिक संकटात आहे. भारताचा नागरिक म्हणून अडचणीच्याप्रसंगी पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य आहे.कर्तव्यपुर्तीचा परिचय देत कोहलगाव ग्रामवासी स्वयंस्फूर्तीने एकवटले. ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला व गावात फिरून ११ हजाराचा निधी संकलीत केला. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ही राशी गोळा करण्यासाठी रविवारी ग्रामपंचायतला सुपूर्द करण्यात आली.

The villagers rushed to help | कोहलगाव ग्रामवासी मदतीसाठी सरसावले

कोहलगाव ग्रामवासी मदतीसाठी सरसावले

Next
ठळक मुद्देस्वयंस्फूर्त : लोकवर्गणी करून ११ हजार रुपये सहायता निधीत

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देश आर्थिक संकटात आहे. भारताचा नागरिक म्हणून अडचणीच्याप्रसंगी पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य आहे.कर्तव्यपुर्तीचा परिचय देत कोहलगाव ग्रामवासी स्वयंस्फूर्तीने एकवटले. ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला व गावात फिरून ११ हजाराचा निधी संकलीत केला. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ही राशी गोळा करण्यासाठी रविवारी ग्रामपंचायतला सुपूर्द करण्यात आली. कोरोनाच्या प्राश्र्वभूमीवर सद्या देशासमोर मोठे संकट ओढवले आहे. कोरोनामुळे बाधित झालेल्या रुग्णांची शुश्रूषा तसेच विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांची व्यवस्था करण्यात यंत्रणा गुंतली आहे. इतर वेळात शासन जनतेला विकास व जनहिताच्या सुविधा उपलब्ध करुन देते. सद्या देशाला हातभार लावण्याची वेळ येऊन ठेपली आहे. या उद्देशाने एकत्र येऊन निधी गोळा केल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. असाच हातभार इतर गावांनीही लावून राष्ट्रहित जोपासावे असा संदेश गावकऱ्यांनी दिला आहे.
या वेळी नोडल अधिकारी अनुपकुमार भावे, सरपंच माधुरी चांदेवार, ग्रामसेवक टिकाराम जनबंधू, ग्रा. पं. सदस्य भाविका दोनाडकर, देवांगणा कोडापे, महानंदा राऊत, सपना वाघाडे, प्रेमलाल लांजेवार, जयलाल भोयर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष हरिभाऊ नैताम, राजेश खंडाईत, रवींद्र वाढई उपस्थित होते.

Web Title: The villagers rushed to help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.