शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त पदांमुळे पशुवैद्यकीय रुग्णालयांची दुरवस्था

By admin | Updated: March 18, 2017 01:57 IST

शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून पशुधन व्यवसाय आहे. अनुदानावर शेतकऱ्यांना पशुधन पुरविले जाते.

शेतकऱ्यांची गैरसोय : अनेक ठिकाणी डॉक्टरांसह कर्मचारीही नाही देवरी : शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून पशुधन व्यवसाय आहे. अनुदानावर शेतकऱ्यांना पशुधन पुरविले जाते. तसेच इतर नागरिकही हजारो रुपयांचे कर्ज घेऊन पशुधन खरेदी करतात. परंतु अशा पशूंची (जनावरांची) प्रकृती बिघडल्यास तालुक्यातील पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे पशूंची वाट लागत आहे. अशा गंभीर बाबींकडे लक्ष देऊन शासनाकडे पाठपुरावा करुन तालुक्यातील पशु वैद्यकीय रुग्णालयाची दुरवस्था त्वरित दूर करावी, अशी मागणी गोंदिया जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून पशुधन व्यवसाय आहे. कुटुंबांच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून शासनाकडून विविध योजनेतून आणि अनुदानावर पशुधन खरेदी केली. तसेच इतर नागरिकांनी सुद्धा हजारो रुपयाचे कर्ज घेऊन पशुधन खरेदी केली आहे. पशु (जनावरांच्या) उपचाराकरिता येथे तालुका पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ आहे. या दवाखान्यात मंजूर पाच पदे आहेत. यात सहायक आयुक्त पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी, वरिष्ठ लिपीक, ड्रेसर आणि परिचर यांचा समावेश आहे. परंतु या ठिकाणी पशुधन विकास अधिकारी, ड्रेसर व परिचरचे पद रिक्त आहे. तसेच तालुक्यात नऊ ठिकाणी राज्यस्तरीय पशुवैद्यकीय श्रेणी-२ चे दवाखाने आहेत. यात फुटाणा, चिचगड, ककोडी, डोंगरगाव (सावली), मुल्ला, डवकी, डोंगरगाव (सडक), डोंगरगाव (खजरी) आणि डव्वा या ठिकाणांचा समावेश आहे. या नऊ ठिकाणी सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व परिचर असे नऊ-नऊ मंजूर पदे आहेत. त्यापैकी फुटाणा, चिचगड, ककोडी, डोंगरगाव (सावली), मुल्ला, डोंगरगाव (सडक), डोंगरगाव (खजरी) आणि डव्वा या आठ ठिकाणी पशु विकास अधिकारीची पदे रिक्त आहेत. तर ककोडी, डोंगरगाव (सावली) डवकी, डोंगरगाव (सडक) आणि डोंगरगाव (खजरी) अशा पाच ठिकाणी परिचराची पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत पशूंची प्रकृती बिघडल्यास पशुविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अभावी उपचार वेळेवर न झाल्याने काही महिन्यातच अशा पशूंची वाट लागत आहे. दवाखान्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अभावी आणि औषधाचा तुटवडा यामुळे हे रुग्णालय मोडकळीस आले आहे. अशा दुरवस्थेत पशूंना उपचाराकरिता नेणे म्हणजे पशूला मृत्यूच्या दाढेत ढकलने होय. मग अशा परिस्थितीत पशु तपासणीचे प्रशिक्षण घेतलेले काही सुशिक्षीत तरुण स्वत:ला पशुचे डॉक्टर असल्याचे सांगत खाजगी दुकानातून औषधी व हातात बॅग घेऊन ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात जाऊन राजसोरपणे पशुवर उपचार करीत आहेत. यात पशुधन पालक डॉक्टर गावातच उपलब्ध होत असल्याने त्या डॉक्टराकडून जनावरांवर उपचार करवून घेत आहे. तर पशुवैद्यकीय दवाखान्यातील चपराशी सुद्धा स्वत:ला डॉक्टर असल्याचे सांगत पशुंवर अघोरी उपचार करीत पैशाची लुट करीत आहेत. आधीच निसर्गाच्या अवकृपेने हवालदिल झालेल्या या शेतकऱ्यांवर उपचाराअभावी लाख मोलाची जनावरे मृत्युमुखी पडल्याने त्यांच्यावर मोठे आभाळ कोसळत आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने पशुवैद्यकीय दवाखाने महत्वाचे आहेत. (प्रतिनिधी)