शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पेन्शनसाठी हजारो कर्मचाऱ्यांची धडक

By admin | Updated: December 6, 2015 02:02 IST

शासकीय व खासगी नोकरीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील ...

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : विविध कर्मचाऱ्यांच्या संघटनेचा पाठिंबागोंदिया : शासकीय व खासगी नोकरीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील हजारो कर्मचारी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी ‘सर्व कर्मचाऱ्यांचा एकच नारा, जुनी पेन्शन लागू करा’ असा नारा देत आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्याच्या नावे निवासी उपजिल्हाधिकारी एन.के.लोणकर यांना देण्यात आले. १० वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पेन्शनसाठी संघटित झालेल्या कर्मचाऱ्यांच्या या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले.१ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत रूजू झालेल्या राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करून त्यांच्यावर अन्याय केला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणारे पेंशन त्यांनी अखंड व प्रामाणिकपणे जगण्यासाठी मिळणारा हक्क आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती नियम १९८२ व सर्वसााधारण भविष्य निर्वाह निधी योजना कर्मचाऱ्यांच्या जीवनातून हद्दपार केली आहे. शासनाच्या अंशदायी पेंशन योजनेला विरोध करून जुनी पेंशन योजना लागू करावी या मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या नेतृत्वात इंदिरा गांधी स्टेडियम येथून पायी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चाचे रूपांतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत झाले. या मोर्चाचे नेतृत्व वितेश खांडेकर, गोविंद उगले, लिकेश हिरापुरे, संदीप सोमवंशी, जे. व्ही. बुध्देवार, चंदू दुर्गे, शालीक कठाणे, दत्तात्रेय बागडे, राजेंद्र कडव, राहुल कळंबे, नितू डहाट, मुकेश रहांगडाले, भूषण लोहारे, एस.एस. सोनवाने, महेंद्र चव्हाण, मानव जाधव, सचिन धापेकर, ये.डी. म्हशाखेत्री, एम.आर. मेश्राम यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)