शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ निर्दयी माता-पित्याचा अद्यापही शोध नाही

By admin | Updated: January 10, 2015 23:07 IST

जयपुरीया यांच्या नर्सिंग होम लगत एक खुल्या प्लॉटमध्ये नवजात चिमुकलीला बेवारस टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप

गोंदिया : गेल्या ४ जानेवारी रोजी शहरातील सिव्हील लाईनमधील डॉ.

जयपुरीया यांच्या नर्सिंग होम लगत एक खुल्या प्लॉटमध्ये नवजात चिमुकलीला बेवारस टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप तिला बेवारस टाकणाऱ्या निर्दयी माता-पित्यांचा अद्याप थांगपत्ता लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. अशात येथील आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने पोलीस अधिक्षक शशीकुमार मिना यांना निवेदन देत त्वरीत शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ४ जानेवारी रोजी पहाटे सहा वाजता दरम्यान उघडकीस आलेल्या या प्रकरणात कुत्र्यांनी तिचे लचके तोडण्याचा प्रयत्न करून डोक्यासह हात पायांवर चावा घेतला होता. जखमी अवस्थेत परिसरातील काही तरूणांनी ‘तिला’ बीजीडब्ल्यु रूग्णालयात उपचारार्थ भर्ती केले होते. मात्र डोळ््याला जबर इजा असल्याने तसेच कडाक्याच्या थंडीत पडून असल्याने तिचे शरीर थंड पडले होते व तिची प्रकृती गंभीर होती. मात्र तिला नागपूरला पाठविण्याची योग्य ती व्यवस्था होत नसल्याने त्या चिमुकलीवर येथेच उपचार सुरू होते. अशात मानवाधिकार संघटनेने पुढाकार घेऊन तिला नागपूरला हलविण्यासाठी प्रयत्न केले. परिणामी तिला नागपूरला हलविण्यात आले व तिच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र हे अमानवीय कृत्य करणाऱ्यांचा शोध न लागल्याने संघटनेचे जिल्हाध्यक्ष टिकेश्वर मिश्र, उपाध्यक्ष सचिन ठाकूर, महासचिव रोहीत अरोरा, सचिव प्रशांत वडेरा, सहसचिव तरंग जायस्वाल, शानू काळे, नवीन जोशी, आकाश पुरोहीत, रविराज ठाकूर, प्रथम माधवानी आदींनी पोलीस अधिक्षक मिना यांना निवेदन देऊन शोध घेऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे. (शहर प्रतिनिधी)