लक्ष्य आठ कोटी मालमत्ता करवसुलीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 06:00 AM2020-01-19T06:00:00+5:302020-01-19T06:00:05+5:30

मालमत्ता कर वसुलीच्या कामात नगर परिषद सुरूवातपासूनच मागे राहिलेली असल्याचे दिसत आहे.बड्या लोकांचा दबाव तर कधी राजकारण्यांची अडसर येत असल्याने मालमत्ता कर वसुली रखडत गेली व आज मागणीपेक्षा थकबाकी जास्त अशी परिस्थिती बघावयास मिळत आहे.

Target tax collection of eight crore properties | लक्ष्य आठ कोटी मालमत्ता करवसुलीचे

लक्ष्य आठ कोटी मालमत्ता करवसुलीचे

Next
ठळक मुद्देअद्याप फक्त १.८१ कोटींची वसुली : मागणीपेक्षा थकबाकीच जास्त

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नगर परिषदेला सर्वात कठीण काम असलेल्या मालमत्ता कर वसुलीचा अंतिम टप्पा आता सुरू झाला असून यंदा नगर परिषदेला नऊ कोटी ८२ लाख पाच हजार ४५० रूपयांची कर वसुली करावयाची होती. त्यातील अद्याप फक्त एक कोटी ८१ लाख ५९ हजार ५५९ रूपयांचीच कर वसुली झाली आहे. म्हणजेच, नगर परिषदेला ३१ मार्चपर्यंत आठ कोटी ४५ हजार ८९१ रूपये मालमत्ता कर वसुलीचे टार्गेट सर करावयाचे आहे.
मालमत्ता कर वसुलीच्या कामात नगर परिषद सुरूवातपासूनच मागे राहिलेली असल्याचे दिसत आहे.बड्या लोकांचा दबाव तर कधी राजकारण्यांची अडसर येत असल्याने मालमत्ता कर वसुली रखडत गेली व आज मागणीपेक्षा थकबाकी जास्त अशी परिस्थिती बघावयास मिळत आहे. यंदा नगर परिषदेला पाच कोटी १८ लाख ६६३ रूपयांची मागील थकबाकी तर चार कोटी ६४ लाख चार हजार ७८७ रूपयांची मागणी असे एकूण नऊ कोटी ८२ लाख पाच हजार ४५० रूपये मालमत्ता कर वसुलीचे टार्गेट होते.
त्यात नगर परिषदेने आतापर्यंत एक कोटी ८१ लाख ५९ हजार ५५९ रूपयांची कर वसुली केली आहे. म्हणजेच, आता नगर परिषदेला ३१ मार्चपर्यंत आठ कोटी ४५ हजार ८९१ रूपयांची कर वसुली करावयाची आहे. मध्यंतरी शासनाने १०० कर वसुलीचे आदेश काढले होते. मात्र तेवढी कर वसुली होणे शक्य नाही. शिवाय नगर परिषद कर विभागात तेवढे मनुष्यबळ नसल्यानेही कर वसुलीत अडचण येते. शिवाय, कर वसुलीसाठी अधिकारी सोबत असल्यास कर्मचारीही जोमात राहतात, त्यामुळे कर वसुलीचा आकडा वाढतो.
मात्र नगर परिषदेत त्यासाठी पुढाकार घेणारा कुणीही दिसत नाही. अशात कित्येकदा कर वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना रिकाम्या हातीच परतावे लागते. आता जानेवारी महिना अर्धा निघून गेला आहे. म्हणजेच, अडीच महिने आता कर वसुलीसाठी उरले असून या कालावधीत नगर परिषदेची किती टक्के मालमत्ता कर वसुली होते हे बघायचे आहे.

जानेवारी महिन्यात फक्त १२ लाखांची वसुली
डिसेंबर महिन्यात सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे पदभार असताना कर वसुली विभागाने मोहिम छेडून ३९ लाख ६७ हजार ५०३ रूपयांची कर वसुली केली होती. याशिवाय, बाजार विभागानेही मोठी रक्कम वसुलीतून उभी केली होती. आता घुगे यांचा कार्यकाळ संपला असून जानेवारी महिन्यातील १५ दिवसांत मात्र फक्त १२ लाख रूपयांची कर वसुली झाल्याची माहिती आहे. म्हणजेच, घुगे यांच्या कार्यकाळात कर वसुलीच चांगली झाली असल्याचे दिसते.

Web Title: Target tax collection of eight crore properties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.