शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
5
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
6
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
7
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
8
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
9
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
10
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
11
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
12
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
13
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
14
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
15
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
16
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
17
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
18
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
19
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
20
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
Daily Top 2Weekly Top 5

आमगाव परिसरातील पथदिवे सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:21 IST

आमगाव : तालुक्यातील अनेक गावातील पथदिवे मागील अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळेस रस्त्यांवरून ये-जा करताना त्रास ...

आमगाव : तालुक्यातील अनेक गावातील पथदिवे मागील अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळेस रस्त्यांवरून ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देऊन ही समस्या दूर करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

स्थानिक नगरपरिषदेचा कारभार सध्या प्रशासकाच्या हाती असून, ग्रामस्थांच्या अडी-अडचणी दूर करण्यासाठी प्रशासकाने कोणतेही पाऊल उचलले नसल्याचे दिसत आहे. मागील अनेक महिन्यांपासून गावातील बनिया मोहला, कामठा चौक, गांधी चौक, बाजार चौक, माल्ही, कुमारटोली, पदमपूर, बनगाव येथील पथदिवे बंद आहेत. यामुळे रात्रीच्या वेळेस अंधारातून वाट शोधावी लागत आहे. यामुळे एखाद्यावेळेस अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरपालिका प्रशासकाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी ज्या ठिकाणी पथदिवे बंद पडले आहेत ते सुरू करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.