शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव टिप्परची दुचाकीला धडक, मायलेक जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 20:11 IST

पती गंभीर जखमी : सुकडी नाका परिसरातील घटना

तिरोडा : भरधाव टिप्परने दुचाकीला मागेहून दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार मायलेकाचा घटनास्थळी मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि.२३) सायंकाळी ४:४५ वाजताच्या सुमारास तालुक्यातील सुकडी नाका परिसरात घडली. हेमलता चौधरी (वय ३५ वर्षे) व तन्मय चौधरी (वय ९ वर्षे) रा. कासा, ता. गोंदिया असे अपघातात जागीच ठार झालेल्या मायलेकाचे नाव आहे तर कमाऊस धर्मदास चौधरी असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या पतीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार कमाऊस चौधरी हे पत्नी व मुलासह गुरुवारी दुपारी आपल्या दुचाकी क्रमांक एमएच-३५ एव्ही ४१०२ ने कासाहून नागपूरकडे जात होते. दरम्यान तिरोडा तालुक्यातील सुकडी नाका जवळ एका भरधाव टिप्परने त्यांच्या दुचाकीला मागेहून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की दुचाकी स्वार हेमलता चौधरी व तन्मय चौधरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर कमाऊस चौधरी हे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्वरित या घटनेची माहिती तिरोडा पोलिसांना दिली. तसेच १०८ रुग्णवाहिका बोलावून जखमीला तिरोडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर टिप्पर चालक घटनास्थळावरून पसार झाला. तिरोडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला तसेच याप्रकरणी गुन्हा नोंद करुन टिप्पर चालकाचा शोध सुरु केला आहे.

नागपूर येथे करीत होते मजुरीचे काम

कमाऊस चौधरी हे नागपूर येथे मजुरीचे काम करतात. काही कामासाठी ते आपल्या गावी कासा येथे आले होते. गुरुवारी दुपारी ते त्यांच्या दुचाकीने नागपूर येथे जात होते. दरम्यान सुकडी नाक्याजवळ भरधाव टिप्परने त्यांच्या दुचाकीला मागेहून जोरदार धडक दिली.
यात हेमलता चौधरी व तन्मय चौधरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर कमाऊस हे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे चौधरी कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Speeding Tipper Hits Bike: Mother and Son Killed Instantly

Web Summary : A speeding tipper truck collided with a motorcycle near Sukdi Naka, Tiroda, killing a mother and her son. The husband was seriously injured. The tipper driver fled the scene; police are investigating.
टॅग्स :Accidentअपघात