शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

अन् परक्या भावांच्या आपुलकीने पाणावले बहिणींचे डोळे

By admin | Updated: November 16, 2015 01:51 IST

आर्थिक दुर्बलांच्या सांसारिक जीवनातील कटू सत्य सर्वांसाठी नवीन नाही. परिश्रमातून मार्गक्रमण करीत त्यांचे कुटुंब नेहमीच हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जातात.

दिवाळी व भाऊबीजचा आनंद : युवा शक्ती फाऊंडेशनचा उपक्रमआमगाव : आर्थिक दुर्बलांच्या सांसारिक जीवनातील कटू सत्य सर्वांसाठी नवीन नाही. परिश्रमातून मार्गक्रमण करीत त्यांचे कुटुंब नेहमीच हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जातात. अशा आर्थिक दुर्बलांच्या लोकवस्तीत त्यांना दिवाळी व भाऊबीजची भेट देण्याचा प्रयत्न युवा शक्ती फाऊंडेशनने केला आहे. त्यांच्या या भेटीने मात्र लोकवस्तीतील परक्या भावांच्या आपुलकीने बहिणींचे अक्षरश: डोळे पाणावले तर क्षणिक आनंदाने काही क्षण आनंदाच्या उजेडाने बहरले. आमगाव शहरातील बिंजवार या लोकवस्तीत हलाखीचे जीवन जगणारे कुटुंब प्रत्येकाच्या नजरेआड आहे. त्यांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी कोणालाही हात घालता आले नाही. त्यामुळे दैनंदिन परिश्रमातून आपल्या जीवनात आनंद वेचण्याचा प्रयत्न हे कुटुंब करीत आहेत. अशा कुटुंबात उत्सव, सण आर्थिक अडचणीतच असतात. त्यामुळे वेळेत मिळणारे आनंद त्यांच्या जीवनात बदल घडवून आणतात. अशाच लोकवस्तीची दखल घेत युवा शक्ती फाऊंडेशनने दिवाळी व भाऊबीजचे उपक्रम घेतले.या उपक्रमांतर्गत लोकवस्तीतील महिलांना भाऊबीजची भेट म्हणून महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. या वेळी युवा शक्ती फाऊंडेशनचे संयोजक यशवंत मानकर, पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार, विशाल राजे, पत्रकार संघाचे अध्यक्ष पालकराम वालदे, रितेश अग्रवाल, निमेश दमाहे, निखिल कोसरकर, युवा शक्ती फाऊंडेशनच्या महिला अध्यक्ष ज्योती खोटोले, नरेंद्र कावळे, डॉ. कार्तिक मेंढे, राजीव फुंडे, आनंद मजे, उत्तम नंदेश्वर उपस्थित होते. सदर उपक्रमात लोकवस्तीतील महिलांसह गणमान्य नागरिक उपस्थित होते. यावेळी महिलांनी उपस्थितांना भाऊबीज ओवाळणी घालून स्वरक्षणाची हमी मिळवून घेतली. तसेच लोकवस्तीतील नागरिकांनी फटाके फोडून दिवाळी व भाऊबीज उत्सवाचा आनंद व्दिगुणित केला. (शहर प्रतिनिधी)