शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सतपुड्याच्या कुशीत घडले झाडीपट्टीचे दर्शन

By admin | Updated: January 11, 2015 22:53 IST

झाडीबोली साहित्य मंडळ साकोलीचा २२ वा झाडीबोली साहित्य संमेलन येथील ‘स्व. हरिदास बडोले साहित्य नगरी’ खिलेश महाविद्यालय परिसरात प्रथमच आयोजित करण्यात आला.

विजय मानकर - स्व.हरिदास बडोले साहित्य नगरी सालेकसाझाडीबोली साहित्य मंडळ साकोलीचा २२ वा झाडीबोली साहित्य संमेलन येथील ‘स्व. हरिदास बडोले साहित्य नगरी’ खिलेश महाविद्यालय परिसरात प्रथमच आयोजित करण्यात आला. त्यामुळे झाडीबोली साहित्य या शब्दापासून अनभिज्ञ असलेले हजारो लोक प्रत्यक्षात झाडीपट्टीच्या संस्कृतीदर्शन घेऊन गदबद झाले. झाडीपट्टीची दंडार, झाडी गौरव गीत, नृत्य नाटक इत्यादी कार्यक्रमासह सर्व साहित्य संमेलनात नवीन उमंग व उत्साह शिगेला पोहचला. शेवटी रविवारी (दि.१२) साहीत्य संमेलनाचा समारोप करण्यात आला. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्र बडोले हे स्वत: साहित्य रसिक असून उत्कृष्ट नाटककार, नकलाकार व शिक्षण क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणारे व्यक्तिमत्व म्हणून त्याची ओळख झालेली आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नाने सतपुडा पर्वत रांगेच्या कुशीत महाराष्ट्राच्या पूर्वी टोकावर असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात महाराष्ट्र मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्याच्या एकत्रित त्रिसंगमावर हे २२ वे झाडीबोली साहित्य संमेलन भरले. अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त भाग असून या भागात मोठा प्रमाणावर आदिवासी लोकांचा व त्यांच्या संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. या सारख्या ठिकाणी बडोले यांनी झाडीपट्टी व आदिवासी संस्कृतीचे सुरेख संगम घडवून आणले. यापूर्वी कधीही असे साहित्य संमेलन या भागात झाले नसल्याने ग्रंथदिंडी, पुस्तकपोहा पाहून सालेकसावासी आश्चर्यचकीत झाले. त्याचप्रकारे लोकराम शेंडे यांनी सादर केलेल्या झाडी गौरव गीतात ‘जय बोला जय जय झाडी, जय मा झाडीपट्टी’ च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. त्यानंतर राम महाजन यांच्या ‘दुकोडा’, डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी ‘ भूमिका’, विष्णु भेंडारकर यांचा ‘अनुभव’ आणि राजेंद्र बडोले यांनी सादर केलेली आदव्याची सुपाटी या प्रस्तुतीमुळे परिसरातील लोकांना यांची संकल्पना पटली. याप्रसंगी अनेक लेखकांची पुस्तके प्रकाशित करण्यात आली. त्याचप्रमाणे बंडोपंत बोडेकर (खंजरी), डॉ. शाम मोहरकर (झाडीपट्टीची रंगभूमी), अंजनाबाई खुणे (झाडीचा झोलना) यांचा सत्कार करण्यात आला. या साहित्य संमेलनात डॉ. बोरकर, प्रा. ओक, पवन पाथोडे, डोमा कापगते, हिरामन लंजे, सुभाष धकाते, शशीकला गावतुरे, अंजणाबाई खुणे, सुखदेव चौथाल, बाबुराव टोंग, नूरजहां पठाण, चंद्रकुमार बहेकार या जुन्या साहित्यीकांसह या परिसरातील नवीन साहित्यकारांनी सुद्धा आपापला साहित्य ठेवा रसिकांसमोर मांडला. अनेकांनी आपल्या कवितेतून झाडीपट्टी संस्कृतीचे दर्शन घडवून आणले. स्थानिक झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष खुशाल साखरे, सचिव महेंद्र वैद्य, कार्याध्यक्ष खेमराज साखरे व त्यांच्या चमूने साहित्य संमेलनाला रंगतदार बनविण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. तसेच विजय मेश्राम, पांडुरंग भेलावे, मिलिंद रंगारी, देवीदास इंदापवार, दौलत खा पठाण आदी कविंनी संमेलनाला सुरेल बनविले.