शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय शेतीतून ८१ एकरात श्री पद्धतीने भात लागवड

By admin | Updated: August 11, 2014 23:59 IST

जिल्ह्यातील मुख्य पिक असलेल्या धानाची लागवड करताना लागवड खर्च वाढला आहे. त्यामुळे कमीत कमी लागवड खर्च आणि जास्तीत जास्त उत्पन्न या तत्वाचे पालन करण्यासाठी अदानी फाऊंडेशनने

गोंदिया : जिल्ह्यातील मुख्य पिक असलेल्या धानाची लागवड करताना लागवड खर्च वाढला आहे. त्यामुळे कमीत कमी लागवड खर्च आणि जास्तीत जास्त उत्पन्न या तत्वाचे पालन करण्यासाठी अदानी फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी तिरोडा परिसरातील पाच गावातील शेतकऱ्यांना शास्त्रोक्त पद्धतीने ‘श्री’ (सिस्टम आॅफ राईस इंटेन्सिफिकेशन) पद्धतीने कशी भात लागवड करावी याचे प्रशिक्षण त्यांना दिले. विशेष म्हणजे हे पिक सेंद्रीय पद्धतीने घेतले जाणार आहे.अदानी फाऊंडेशनने तिरोडा परिसरातील जी गावे दत्तक घेतली आहेत त्यापैकी ५ गावांमध्ये ‘पायलट प्रोजेक्ट’च्या रूपात शेतकऱ्यांना या पद्धतीने भात लागवडीसाठी प्रवृत्त केले जात आहे. यात तांत्रिक पद्धतीने जास्त उत्पन्न घेण्याचा आणि कमी खर्चाच्या सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी अदानी फाऊंडेशनने हिवरा येथील कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा आयोजित केला होता. त्यात कवलेवाडा, जमुनिया, चिरेखनी, चिखली आणि भिवापूर येथील शेतकरी यात गावांतील १५० शेतकऱ्यांना तीन बॅचमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. या शेतकऱ्यांनी नंतर आपापल्या गावांमध्ये जाऊन इतर शेतकऱ्यांना याबाबतची शास्त्रोक्त माहिती दिली. त्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनीही त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी श्री पद्धतीने धानाची लागवड करण्याची तयारी दर्शविली त्या प्रत्येकाला ३ किलो धानाचे बियाणे देण्यात आले. यातून या पायलट प्रोजेक्टसाठी ८१ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली.धानाच्या पऱ्हांची वाढ झाल्यानंतर कृषी सहायकांच्या मदतीने एका शेतात धानाच्या रोपांची योग्य पद्धतीने कशी लागवड करायची याचेही प्रात्यक्षिक देण्यात आले. सदर शेतकऱ्यांना सेंद्रीय खत निर्मितीसाठी २०० प्लॅस्टिकचे ड्रमही वाटप करण्यात आल्याचे अदानी फाऊंडेशनच्या वतीने सांगण्यात आले .(जिल्हा प्रतिनिधी)