शिवसेनेचे विद्युत अधीक्षकांना निवेदन

By Admin | Updated: May 30, 2014 00:12 IST2014-05-30T00:12:19+5:302014-05-30T00:12:19+5:30

जिल्हा शिवसेनेने भारनियमन बंद करण्याबाबतचे निवेदन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजकुमार कुथे यांच्या नेतृत्वात विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता फुलकर यांना दिले.

Request to Shivsena Power Superintendent | शिवसेनेचे विद्युत अधीक्षकांना निवेदन

शिवसेनेचे विद्युत अधीक्षकांना निवेदन

गोंदिया : जिल्हा शिवसेनेने भारनियमन बंद करण्याबाबतचे निवेदन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजकुमार कुथे यांच्या नेतृत्वात विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता फुलकर यांना दिले.
निवेदनानुसार, महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीद्वारे केव्हाही भारनियमन केले जाते. दिवसा अधिक वेळ भारनियमन असल्यामुळे जिल्ह्यातील जनतेला नवतपाच्या तीव्र उष्णतेत संपूर्ण दिवस काढावे लागते. पदवीच्या परीक्षा सुरू असल्यामुळे विद्युतअभावी विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम पडत आहे. उष्णतेच्या प्रकोपाने रोगांचे शक्यताही वाढली आहे. बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या मुद्यांना घेवून अधीक्षक अभियंता फुलकर यांना घेराव करून निवेदन देण्यात आले.
यावेळी अधीक्षक फुलकर यांनी भारनियमन बंद करण्याचे आश्‍वासन शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले.
याप्रसंगी भारनियमन बंद करण्यात आले नाही तर आंदोलन करण्याचा इशारासुद्धा शिवसेनेने दिला आहे. याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील लांजेवार, तेजराम मोरघडे, जितेश टेंभरे, तालुका प्रमुख मुन्ना बहेकार, राज बोंबार्डे, सदाशिव विठ्ठले, सुनील मिश्रा, जि.प. सदस्य राजेश चांदेवार, प्रशांत ठवकर, रितेश वर्मा, नगरसेवक हर्षपाल रंगारी, नीरज रहांगडाले, गजेंद्र फुंडे, पुरूषोत्तम ठाकरे, दीपक बोबडे, शुभम गोयल, संजय यादव, चुन्नी चौरावार, विनोद तामसेटवार, विवेक चौधरी, गयाप्रसाद मिश्रा, पप्पू मोहबे, मुन्ना बोपचे, पांडे, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.  (प्रतिनिधी)
 

Web Title: Request to Shivsena Power Superintendent