शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ तीनही नगरसेवकांच्या प्रकरणाची फेरसुनावणी

By admin | Updated: January 10, 2015 01:32 IST

तत्कालीन अपर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश रद्द करीत नागपूर खंडपिठाच्या उच्च न्यायालयाने येथील तीन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना फेरसुनावणीचे आदेश दिले आहेत.

गोंदिया : तत्कालीन अपर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश रद्द करीत नागपूर खंडपिठाच्या उच्च न्यायालयाने येथील तीन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना फेरसुनावणीचे आदेश दिले आहेत. ६ जानेवारी रोजी न्यायालयाने दिलेल्या या आदेशामुळे भगत ठकरानी, ममता बंसोड व निर्मला मिश्रा यांना सदस्यत्व पुन्हा बहाल झाले आहे. ११ डिसेंबर २०१२ रोजी घेण्यात आलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षातील पाच सदस्यांनी लोकतांत्रीक कॉंग्रेस नामक वेगळा दबाव गट तयार केला होता. या पाच सदस्यांनी केलेल्या या कृत्यामुळे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली होती व संपूर्ण वातावरण ढवळून निघाले होते. कालांतराने हे पाचही सदस्य कॉंग्रेस पक्षात परतून आले होते मात्र यातील भगत ठकरानी, ममता बंसोड व निर्मला मिश्रा यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अनिल पांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. नगरसेवकांच्या पक्षांतराच्या या प्रकरणात तत्कालीन उप जिल्हाधिकारी कारकर यांच्याकडे सुनावणी सुरू होती. याप्रकरणी कारकर यांनी ठकरानी, मिश्रा व बंसोड यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाची प्रत या सदस्यांनी २५ एप्रिल रोजी मिळाली व त्याविरोधात या तिघांनी नागपूर खंडपिठाच्या उच्च न्यायालयात अपील केली होती. आमची बाजू मांडू न देता जिल्हाधिकाऱ्यांनी आपला निर्णय सुनावल्याचा ठपका ठेवत तिघांनी दाखल केलेल्या अपीलच्या सुनावणीत न्यायालयाने या प्रकरणाची पुन्हा सुनावणी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे या तिघा सदस्यांना त्यांचे सदस्यत्व पुन्हा प्राप्त झाले असून पालिके च्या कामकाजात आता ते पूर्वी प्रमाणेच सहभागी होऊ शकतील. (शहर प्रतिनिधी)