शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

गैरप्रकार टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज

By admin | Updated: February 28, 2017 00:56 IST

विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणारी बारावीची परीक्षा मंगळवार दि.२८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.

आजपासून बारावीची परीक्षा : २३ हजार २१३ विद्यार्थ्यांसाठी ६९ केंद्रगोंदिया : विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणारी बारावीची परीक्षा मंगळवार दि.२८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. सकाळी ११ ते २ या वेळेत पहिलाच पेपर इंग्रजीचा आहे. यंदा एकाही केंद्रावर कॉपीसारखा गैरप्रकार घडू नये यासाठी यंत्रणेला योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. भरारी पथकांना तालुके नेमून देण्यात आले असून केंद्रांवरही चोख बंदोबस्त राहणार आहे. परीक्षा अधिनियमानुसार परीक्षेतील गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी केंद्र संचालक व अतिरिक्त केंद्र संचालक यांना सूचना देऊन एका केंद्रावर सात व वर्गखोलीत तीन वेळा कॉपी (आक्षेपार्ह साहित्य) आढळल्यास ‘सामूहिक कॉपी’ सुरू असल्याचे गृहित धरून कारवाई केली जाणार आहे. परीक्षार्थ्यांनी वह्या, पिशवी किंवा मोबाईल आणू नये, प्रवेश पत्र व पेन घेऊन यावे. ज्या वर्गात कॉपी चालत असेल त्यासाठी त्या वर्गातील पर्यवेक्षकांना जबाबदार धरून त्यांचेवर कारवाई केली जाणार आहे. मागच्या वर्षी रसायनशास्त्राच्या पेपरला कोसमतोंडी येथील एका केंद्रावर सामूहिक कॉपी करताना पकडण्यात आले होते. त्यामुळे आता गोंदिया जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्हाभर ६९ केंद्र यावर्षी बारावीचे २३ हजार २१३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यात गोंदिया तालुक्यातील २२ केंद्रावरून ७ हजार ४८६ विद्यार्थी, आमगाव तालुक्यातील ६ केंद्रांवरून २ हजार ४७ विद्यार्थी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ७ केंद्रांवरून २ हजार ५३८ विद्यार्थी, देवरी तालुक्यातील ५ केंद्रांवरून १ हजार ८३२ विद्यार्थी, गोरेगाव तालुक्यातील ७ केंद्रांवरून २ हजार ५०५ विद्यार्थी, सडक-अर्जुनी तालुक्यातील ६ केंद्रांवरून २ हजार ४८ विद्यार्थी, सालेकसा तालुक्यातील ६ केंद्रांवरून १ हजार ७१२ विद्यार्थी तर तिरोडा तालुक्यातील १० केंद्रांवरून ३ हजार ४५ विद्यार्थी असे एकूण ६९ केंद्रांवरून २३ हजार २१३ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)सात भरारी पथकांची गस्तदहावी व बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी सात भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे पथक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे पथक, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, डायट प्राचार्य, महिला पथक, बोर्डाचे पथक व जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार एक पथक असे सात पथक विविध केंद्रांवर सतत गस्त घालणार आहेत.‘त्या’ १८९ विद्यार्थ्यांचा निकाल लागलाच नाही मागच्या वर्षी कोसमतोंडी येथील फुलीचंद भगत कनिष्ठ महाविद्यालयात रसायनशास्त्राच्या पेपरला सामूूहिक कॉपी करताना १८९ विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले होते. भरारी पथकाने त्या १८९ विद्यार्थ्यांसंदर्भात तक्रार केली. न्यायालयातूनही पथकाच्या बाजूने निकाल देण्यात आला. मात्र कॉपी करणाऱ्या त्या १८९ विद्यार्थ्यांचा निकाल अद्यापही लागला नाही. यंदा त्या केंद्राची मान्यता रद्द करण्यात आली आहे.