शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानक, की खुले मदिरालय!

By admin | Updated: January 12, 2015 22:51 IST

दक्षिण-पूर्ण-मध्य रेल्वेच्या नागपूर ते बिलासपूरपर्यंतच्या मार्गावरील सर्वाधिक उत्पन्न देणारे रेल्वेस्थानक म्हणून गोंदिया रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. त्यामुळेच येथे विविध प्रकारच्या सोयीसुविधा

देवानंद शहारे- गोंदियादक्षिण-पूर्ण-मध्य रेल्वेच्या नागपूर ते बिलासपूरपर्यंतच्या मार्गावरील सर्वाधिक उत्पन्न देणारे रेल्वेस्थानक म्हणून गोंदिया रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. त्यामुळेच येथे विविध प्रकारच्या सोयीसुविधा वाढविल्या जात आहेत. दररोज जवळपास ४० हजार प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या या स्थानकात रात्रीच्या वेळी मात्र वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. गाडीच्या प्रतीक्षेत अनेक प्रवासी स्थानकाच्या आवारात मद्यप्राशन करीत असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आला. या प्रकाराने गोंदियाचे रेल्वेस्थानक खुले मदिरालय झाल्याचा भास होतो. मात्र या गंभीर प्रकाराबाबत रेल्वे पोलीस मात्र ‘अनभिज्ञता’ दर्शवित आपल्या कर्तव्यतत्परतेचा परिचय देत आहेत.गोंदिया स्थानकावर दररोज सरासरी २० हजार प्रवासी उतरतात आणि तेवढेच चढतात. मात्र काही प्रवासी विलंबाने धावणाऱ्या आपल्या गाडीच्या प्रतीक्षेत येथील ‘होम प्लॅटफार्म’वर सायंकाळी मदिराप्राशनाचा कार्यक्रम उरकून घेतात. या कार्यक्रमानंतर बियर, देशी-विदेशी दारूच्या बाटल्या फलाटावरील भिंतीला लागूनच टाकल्या जातात. कमी पैशात वेळेचा सदुपयोग (?) करण्याचा हा प्रकार रेल्वेच्या नियमांची ऐसीतैसी करणारा आहे. मात्र सर्रासपणे होणाऱ्या या गैरप्रकाराकडे रेल्वे पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. अशा मद्यपींमुळे अनेक वेळा महिलांना असुरक्षित वाटायला लागते. यातूनच एखाद्या वेळी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोंदिया रेल्वे स्थानकावरून पूर्वेकडे बिलासपूर, पश्चिमेकडे नागपूर, उत्तरेकडे बालाघाट तर दक्षिणेकडे चंद्रपूर या चारही दिशांनी रेल्वे प्रवास होतो. येथील होम प्लॅटफार्मच्या शेजारी लगेज किंवा पार्सलची ने-आण करण्यासाठी अप्सरा बियर बार शेजारी एक नवीन प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहे. हे गेट केवळ साहित्यांची ने-आण करतानाच सुरू असते. मात्र या गेटला लागूनच एक लहान गेट असून ते नेहमी सुरू असते. या गेटचा उपयोग प्रवासी ‘शॉर्टकट’ म्हणून वापरून रेल्वे स्थानकात ये-जा करण्यासाठी करतात. सायंकाळच्या सुमारास नेमक्या याच लहान गेटपासून बियरच्या बाटल्या व दारूच्या रिकाम्या पव्व्यांची रांग लागते. या लहान गेट शेजारीच मद्यपान होत असल्यामुळे महिला प्रवाशांना मोठाच त्रास होतो. काही महिला सायंकाळनंतर येथून जाण्यास धजावत नाही. काही मद्यपी मद्यपानानंतर या गेटच्या जवळच नशेत धुंद होवून पडून राहतात. अशावेळी त्यांना ओलांडून जाणे म्हणजे नाक दाबून तारेवरची कसरतच ठरते. काही वेळा गाडी आणखी लेट झाली तर एखाद्याला पाठवून दारू मागविली जाते आणि ‘जाम पे जाम’ चढविले जातात.