शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभरात ३५ कोटी रुपयांची धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 05:00 IST

खरीप हंगामातील धान खरेदीला दिवाळीनंतर वेग आला आहे. यंदा खरीप हंगामातील धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ७० धान खरेदी केंद्राचे नियोजन केले आहे. तर सध्या ६१ धान खरेदी केंद्र सुरु झाले आहे. शासनाने यंदा धानाला प्रती क्विंटल १८६८ ते १८८८ रुपये हमीभाव आणि ७०० रुपये प्रती क्विंटल दर जाहीर केला आहे. तर बाहेर ऐवढा दर मिळत नसल्याने शेतकरी शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी गर्दी करीत आहे.

ठळक मुद्दे६१ धान खरेदी केंद्र सुरु : नवीन धान खरेदी केंद्राची प्रतीक्षा, बैठकीनंतरच मान्यता

  लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  दिवाळीनंतर जिल्ह्यात धान खरेदी केंद्रावरील धानाची आवक वाढली आहे. मागील आठ दिवसांच्या कालावधीत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या ६१ धान खरेदी केंद्रावरुन ३५ कोटी ३७ लाख रुपयांची धान खरेदी करण्यात आली आहे. मात्र अद्यापही पूर्ण धान खरेदी केंद्र सुरु झाल्याने काही भागात शेतकऱ्यांची समस्या कायम आहे. खरीप हंगामातील धान खरेदीला दिवाळीनंतर वेग आला आहे. यंदा खरीप हंगामातील धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ७० धान खरेदी केंद्राचे नियोजन केले आहे. तर सध्या ६१ धान खरेदी केंद्र सुरु झाले आहे. शासनाने यंदा धानाला प्रती क्विंटल १८६८ ते १८८८ रुपये हमीभाव आणि ७०० रुपये प्रती क्विंटल दर जाहीर केला आहे. तर बाहेर ऐवढा दर मिळत नसल्याने शेतकरी शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी गर्दी करीत आहे. सध्या हलक्या धानाची कापणी आणि मळणी पूर्ण झाली असल्याने याच धानाची विक्री करीत आहे. मात्र आता जड धानाच्या कापणीाला सुध्दा सुरुवात झाली असून हा धान देखील पंधरा दिवसात बाजारपेठेत विक्रीस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे धान खरेदी केंद्रावर धानाची आवक वाढण्याची शक्यता आहे. मार्केटिंग फेडरेशनने आतापर्यंत १ लाख ३५ हजार क्विंटल धान खरेदी केली असून खरेदी केलेल्या धानाची किमत ३५ कोटी ३७ लाख रुपये आहे. उर्वरित ९ धान खरेदी केंद्र अद्यापही सुरु झाले नसल्याने काही भागातील शेतकऱ्यांची कोंडी अद्यापही कायम आहे. नवीन धान केंद्रांना मंजुरीची प्रतीक्षा धान खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांची गर्दी कमी करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची दूरवर पायपीट कमी करण्यासाठी यंदा धान खरेदी केंद्राची संख्या वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जळपास ३० ते ३५ धान खरेदी केंद्र वाढण्याची शक्यता असून यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीची मंजुरी मिळताच हे धान खरेदी केंद्र सुरु केले जाणार असल्याची माहिती आहे. महामंडळाने खरेदी केला २२ हजार क्विंटल धान आदिवासी विकास महामंडळातंर्गत आतापर्यंत ४४ पैकी केवळ १३ धान खरेदी केंद्र सुरु झाले असून या धान खरेदी केंद्रावरुन आतापर्यंत २२ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. महामंडळाची २४ हून अधिक धान खरेदी केंद्र सुरु झाले नसल्याने आदिवासी भागातील शेतकऱ्यांना अद्यापही खासगी व्यापाऱ्याच्या दारात जावे लागत आहे.  

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड