शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

गरज पडल्यास पुजारीटोलाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:00 IST

गोंदिया शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून शहरातील ५ पाणी टाकीतून ११ दशलक्ष लीटर पाणी पुरविले जाते. यामध्ये प्रती व्यक्ती १३५ लीटरप्रमाणे पाणी पुरवठा केला जातो. यासाठी मजिप्रा ग्राम डांर्गोली येथील वैनगंगा नदीतून पाणी घेते. जिल्ह्यात पावसाळ््यात चांगला पाऊस पडल्यास प्रकल्प व नदीनाले भरून राहिल्याने उन्हाळ््यात पाणी टंचाई जाणवत नाही.

ठळक मुद्देमजिप्राने केले पाण्याचे आरक्षण : शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी नियोजन पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मागील २ वर्षांपासून पुजारीटोला धरणाचे पाणी आणत आहे. यंदा मात्र सध्यातरी वैनगंगा नदीला पाणी असल्यामुळे तशी गरज पडलेली नाही. मात्र मे व जून महिन्यात काय स्थिती निर्माण होते हे सांगता येत नसल्याने गरज पडल्यास शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी पुजारीटोलाचे पाणी आणावे लागणार आहे. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पुजारीटोला प्रकल्पातील पाण्याचे आरक्षण करून ठेवले आहे.गोंदिया शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून शहरातील ५ पाणी टाकीतून ११ दशलक्ष लीटर पाणी पुरविले जाते. यामध्ये प्रती व्यक्ती १३५ लीटरप्रमाणे पाणी पुरवठा केला जातो. यासाठी मजिप्रा ग्राम डांर्गोली येथील वैनगंगा नदीतून पाणी घेते. जिल्ह्यात पावसाळ््यात चांगला पाऊस पडल्यास प्रकल्प व नदीनाले भरून राहिल्याने उन्हाळ््यात पाणी टंचाई जाणवत नाही. मात्र मागील २ वर्षांत पावसाच्या अनियमितपणामुळे नदी-नाले आटले व परिणामी गोंदिया शहराची तहान भागविण्यासाठी मजिप्राला पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला प्रकल्पातील पाणी सोडून ते वैनगंगेत आल्यानंतर गोंदिया शहराची तहान भागविता आली होती.यंदा मात्र सध्या तरी वैनगंगा नदीत पाणी असल्याने पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणण्याची पाळी मजिप्रावर आलेली नाही. आता मे महिन्याची सुरूवात झाली असून पूर्ण महिना शिल्लक आहे. तसेच जून महिन्यातही कडक उन्हाळा राहतो व या महिन्यांत काय स्थिती निर्माण होते हे आतापासूनच सांगता येणे कठीण आहे. मात्र असे असतानाही मजिप्राने शहरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पुजारीटोला प्रकल्पातील पाणी आरक्षीत केले आहे. येत्या दिवसांत काय स्थिती निर्माण होते ते बघून पुढे काय करायचे याबाबतचे नियोजन मजिप्राने केले आहे. म्हणजेच गरज पडल्यास पुजारीटोला प्रकल्पाचे पाणी मागवून गोंदिया शहरवासीयांची तहान भागविली जाणार आहे.बंधारा बांधकामामुळे पाणी पातळीत वाढवैनगंगा नदीतील पाणी संपल्यास मजिप्राला पुजारीटोला प्रकल्पातील पाण्यासाठी धाव घ्यावी लागते. मात्र ही वेळ येवू नये यासाठी मजिप्राने नदीत २५ एप्रिलपासून बंधारा बांधून पाणी अडविण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पाण्याची पातळी वाढली असून पुजारीटोला प्रकल्पाचे पाणी घेण्याची वेळ आली नाही. शिवाय कॅनलला पाणी सोडण्यात आले असून त्यामुळेही नदीत पाणी असल्याचे मजिप्राचे विभागीय अभियंता राजेंद्र मडके यांनी सांगीतले. मात्र येत्या काळात गरज पडल्यास मजिप्राने नियोजन केले असून पुजारीटोला प्रकल्पातील आरक्षीत केलेले पाणी मागविता येईल असेही त्यांनी सांगीतले.प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठाआजघडीला जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पात ३१.८१ टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी याच काळात १९.९० टक्के पाणीसाठा होता. सिरपूर प्रकल्पात ३०.२० टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी २१.५८ टक्के पाणीसाठा होता. तर पुजारीटोला प्रकल्पात ५२.७८ टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी २०.८८ टक्के पाणीसाठा होता. तर यंदा कालीसरार प्रकल्पात पाणीसाठा नसून मागील वर्षी मात्र ४०.१३ टक्के पाणीसाठा होता.

टॅग्स :Damधरणriverनदी