शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी जोरात

By admin | Updated: January 10, 2015 01:34 IST

पोलिओचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने १८ जानेवारी व २२ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे.

गोंदिया : पोलिओचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने १८ जानेवारी व २२ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील एकही मुल पोलिओ लसीपासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांनी जिल्हा समन्वय समितीच्या मोहिमेबाबत आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवि धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी हरिश कळमकर, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजीव दोडके उपस्थित होते.डॉ.सैनी म्हणाले, पल्स पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यामध्ये आरोग्य विभागाची अत्यंत महत्वाची भूमिका आहे. म्हणूनच एकही बालक या मोहिमेतून सुटू नये याकरिता एकजुटीने मोहिमेत सहभागी होणे आवश्यक आहे.यावेळी डॉ.रवि धकाते यांनी मोहिमेत सहभागी आरोग्य यंत्रणेबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. बुथवरील लसीकरण योजनेमध्ये ० ते ५ वर्षे वयोगटातील १ लाख १० हजार ५५७ बालकांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मोहिमेतील एकूण बुथची संख्या १३८४ असून ग्रामीण भागात १२६४ व शहरी भागात १२० बुथ राहतील. या मोहिमेमध्ये ३१३९ मनुष्यबळ काय करणार असून २८९ पर्यवेक्षक नेमण्यात आले आहे.आयपीपीआय कृती योगनेंतर्गत बुथवरील लसीकरणानंतर ग्रामीण भागात तीन दिवस व शहरी भागात पाच दिवस लसीकरण करण्यात येईल. यामध्ये सर्व क्षेत्रात पाडे, वस्त्या, विटभट्या, शेतात राहणारे मजूर, मुस्लिमवस्ती, मेंढपाळ, परप्रांतातून आलेले कुटुंबे, धाबे, शेतावरील घरे, बांधकामाची ठिकाणे, शहरालगतचा भाग, झोपडपट्या, पहिल्या दुसऱ्या मजल्यावरील घरे, ज्या भागात नकारार्थी लाभार्थ्यांचे कार्यक्षेत्र आहे, प्राथमिक लसीकरण कमी आहे अशा ठिकाणी व अशा सर्व क्षेत्रात घरोघरी लसीकरण राबविण्यात येणार आहे. मोहिम राबविण्यासाठी ग्रामीण व शहरी असे एकूण १५ लाखट ७२ हजार २६४ रुपये निधी शासनाद्वारे पुरविण्यात येणार आहे. अशी माहिती डॉ. रवि धकाते यांनी दिली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिश कळमकर यांनी पल्स पोलिओ मोहिमेबाबत प्रस्तूतीकरण केले.बैठकीला केटीएस रुग्णालयाचे बाह्यसंपर्क निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद वाघमारे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सलील पाटील, सर्व तालुका अधिकारी, नोडल अधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे, जिल्हा लेखा व्यवस्थापक, जिल्हा समन्वयक, शिक्षणाधिकारी, तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मेश्राम व पोलिस विभागातील अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)