शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणमुक्त दिवाळीवर गोंदियावासीयांचा भर!

By admin | Updated: October 25, 2014 01:32 IST

आरोग्यावर होणारा परिणाम तसेच वातावरणातील वाढते प्रदूषण बघता नागरिकांनी आता दिवाळीच्या ....

गोंदिया : आरोग्यावर होणारा परिणाम तसेच वातावरणातील वाढते प्रदूषण बघता नागरिकांनी आता दिवाळीच्या सणात देखील फटाक्यांचा वापर कमी केला आहे. याला महागाईंचाही फटका ही तेवढाच कारणीभूत असून यामुळेच नागरिकांचा फटाकेमुक्त दिवाळीवर भर दिसून आला. फटाके फोडल्याशिवाय अनेकांची दिवाळीच साजरी होत नाही. मात्र महागाईच्या फटक्यापासून फटाके सुद्धा सुटले नसून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होत आहेत. पूर्वी २०० ते ३०० रुपयात सर्व प्रकारचे फटाके येत होते. मात्र आता हजार रूपयांचे फटाके घेऊनही ते पुरेसे होत नाही. आजची शिकलेली व जागरूक पिढी आरोग्याबाबत अधिकच गंभीर आहे. फटाक्यांचा धूराचा आरोग्यावर होणारा परिणाम शिवाय वातावरणातील वाढते प्रदूषण अशांना भावणारे नसल्याने त्यांचा कल फटाकेमुक्त दिवाळीकडे दिसून येत आहे. दिवाळीत फटाक्यांचा वापर कमी करून रोशनाई, एकत्र परिवार तसेच नातेवाईक व आप्तेष्टांच्या भेटीगाठीचा आनंद लुटण्याकडे या पिढीचा कल दिसून येत आहे. एकंदर महागाई व फटाक्यांचे दुष्परिणाम या दोन्ही बाबींमुळे नागरिकांचा कल फटाकेमुक्त दिवाळीकडे वाढत चालल्याचे बघावयास मिळत आहे. परिणामी फटाका व्यवसायात होत असलेली उलाढाल देखील यंदा जाणवली नसल्याचे काही व्यवसायीकांनी बोलून दाखविले. याबाबत ‘लोकमत’ने कानोसा घेतला असता दिवाळी साजरी करताना सर्वसामान्य नागरिकांना बऱ्याच प्रमाणात महागाईची झळ सहन करावी लागल्याचे दिसून आले. यातूनच फटाक्यांची विक्री दरवर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचे फटाके व्यावसायिकांनी सांगितले.यंदा पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांचे पिक अजून दारी आलेले नाही. शासकीय धान खरेदीही सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. त्यामुळे दिवाळीसारखा सण यंदा नागरिकांना उत्साहाने साजरा करता आला नाही. याचा परिणाम फटाके व्यायसायिकांवर होवून फटाक्यांची विक्री कमी झाल्याचे गोंदियातील फटाका व्यावसायिकांनी सांगितले. शहरी नागरिकही फटाक्यांचे वाढते दर पाहता ते खरेदी करताना हात आखडता घेताना दिसले. विशेष म्हणजे प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये जागृती येत असल्यानेही फटाके फोडून पैशाचा चुराडा कशाला करायचा? अशी प्रतिक्रिया काही सूज्ञ नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. शहरात सहा ते सात फटाके विक्रीचे ठोक व्यावसायिक आहे. याशिवाय जवळपास १०० किरकोळ विक्रेते आहेत. यंदा नागरिकांनी कमी आवाजाच्या व स्वस्त दराच्या फटाक्यांना पसंती दर्शवून ते खरेदी केले. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान न होता ध्वनी व वायू प्रदूषण टाळण्याची नागरिकांची भावना दृढ होत असल्याचे दिसून आले. अनार, फुलझडी, चक्री, लुझबॉम्ब, टिकल्या, आगपेटी, फॅन्सी फटाके आदी अत्यंत कमी आवाजाचे फटाके यंदा अधिक प्रमाणात विक्री झाले. याशिवाय बाजारात सुतळी बाँब, लक्ष्मी बाँब, रॅकेट, एकापाठोपाठ सात ते ३० आवाज होणारे फटाके उपलब्ध होते. मात्र ते कमी प्रमाणात विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)