घराबाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 05:00 AM2020-04-04T05:00:00+5:302020-04-04T05:00:09+5:30

कोरोनाचा कहर देशात दिवसेंदिवस वाढत असल्याने रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘सोशल डिस्टंन्सिंग’ हाच एकमेव उपाय असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकांनी आपापल्या घरात राहणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊनच अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. याशिवाय, विविध प्रतिबंधात्मक कलमा लावून लोकांना घरबाहेर पडणे व गर्दी करण्यावर अंकुश लावण्यात आले आहे.

Police look at the outdoorsmen | घराबाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांची नजर

घराबाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांची नजर

Next
ठळक मुद्देवाहनातून दिली जात आहे सूचना : अन्यथा कठोर कारवाईचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले असतानाही काही बेजबाबदार नागरिक आदेशाचे उल्लंघन करून विनाकारण रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. रस्त्यावर फिरणारे हे सर्व पोलिसांच्या नजरेत येत असून अशांना पोलिसांकडून वाहनांतून आत राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. मात्र त्यावर काहीच परिणाम जाणवत नसल्याने आता कठोर कारवाईच्या तयारीत पोलीस विभाग दिसत असून तसा इशारा देण्यात आला आहे.
कोरोनाचा कहर देशात दिवसेंदिवस वाढत असल्याने रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘सोशल डिस्टंन्सिंग’ हाच एकमेव उपाय असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकांनी आपापल्या घरात राहणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊनच अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. याशिवाय, विविध प्रतिबंधात्मक कलमा लावून लोकांना घरबाहेर पडणे व गर्दी करण्यावर अंकुश लावण्यात आले आहे. शासनाच्या आदेशाला सुमारे ९०-९५ टक्के नागरिक जुमानत असले तरिही उरलेले काही बेजबाबदार मात्र आदेशाचे उल्लंघन करून घराबाहेर पडत आहेत.
अशा या समाजकंटकांच्या दुर्लक्षीत धोरणामुळे कोरोनाचे रूग्ण वाढतच असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे.विशेष म्हणजे, घराबाहेर फिरणाºया या लोकांवर पोलिसांची नजर असून फक्त थेट काठीचा वापर योग्य नसल्याने तेही समजूत घालून अशांना घरी राहण्यासाठी आवाहन करीत आहेत. मात्र त्याचा काहीच परिणाम जाणवत नसल्याने आता मात्र पोलिसांनी वाहनांतून लोकांना सूचना देण्यास सुरूवात केली आहे.यानंतरही लोकांनी घराबाहेर फिरणे बंद न केल्यास मात्र कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

परिवार व स्वत:साठी घरात रहा
कोरोनासोबत सुरू असलेला हा लढा शासनाचा स्वत:साठी नसून देशवासीयांसाठी सुरू आहे. यामुळे लोकांनी आपापल्या घरात राहूनच कोरोनाला मात देण्यास सहकार्य करावे असे पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांसाठी सर्वच मंत्री व अधिकारी आवाहन करीत आहेत. मात्र काही शासनाचे आवाहन गमतीत घेत जाणून घराबाहेर निघत आहे. कुणासाठी नव्हे तर आपल्या परिवार व स्वत:साठी घरात असे आवाहन केले जात आहे.
वसाहतींमध्ये आदेशाची धुडकावणी
बाजारभाग व शहरातील मुख्य रहिवासी भागातील लोक घरबाहेर निघणे टाळत आहेत. मात्र नव्याने शहरा लगत वसलेल्या कॉलनींमध्ये पोलीस जात नसल्याने या कॉलनींंमध्ये दिवसभर नागरिकांची ये-जा सुरूच असते. विशेष म्हणजे, गुटखा शौकींनाना गुटख्या शिवाय होत नसल्याने ते हमखास जुगाड करण्यासाठी निघत असल्याचे दिसत आहे.

रात्रीला पोलीस गस्त गरजेची
दिवसा पोलिसांचा बंदोबस्त राहत असल्याने घराबाहेर पडणे धोकादायक आहे. मात्र रात्रीला कुणीही नसल्याने आरामात फिरायला निघणाऱ्यांची संख्या कमी नाही. रात्रीला कुणी जेवणानंतर शतपावली करायला, कुणी फोनवर बोलण्यासाठी तर कुणी घरातील कुत्र्यांना फिरविण्यासाठी घराबाहेर निघत असल्याचे बघावयास मिळत आहे. विशेष म्हणजे, यामध्ये महिलांचाही समावेश असून यांना पकडून कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी रात्रीला गस्त करण्याची गरज आहे.

Web Title: Police look at the outdoorsmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.