शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅटफाॅर्म तिकीट ५० रुपये तरीही गर्दी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 05:00 IST

रेल्वेस्थानकावर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही उपाययोजना केल्या होत्या. त्यातच प्लॅटफाॅर्म तिकिटाचा दर ५० रुपये केला होता. त्यामुळे प्लॅटफाॅर्म तिकीट विक्रीत बरीच घट झाली होती. आता हा दर जरी पुन्हा १० रुपये करण्याचा निर्णय झाला असला तरी अद्यापही याबाबत निर्देश गोंदिया रेल्वेस्थानकाला प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे प्लॅटफाॅर्म तिकिटाचा दर ५० रुपयेच कायम आहे. 

ठळक मुद्देदररोज दीडशे तिकिटांची विक्री : ८ जूनपासून झाली प्रवासी संख्येत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षापासून रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीची गाडी अद्यापही शंभर टक्के रुळावर आलेली नाही. काही विशेष आणि मोजक्याच गाड्या सध्या धावत आहेत. रेल्वेस्थानकावर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही उपाययोजना केल्या होत्या. त्यातच प्लॅटफाॅर्म तिकिटाचा दर ५० रुपये केला होता. त्यामुळे प्लॅटफाॅर्म तिकीट विक्रीत बरीच घट झाली होती. आता हा दर जरी पुन्हा १० रुपये करण्याचा निर्णय झाला असला तरी अद्यापही याबाबत निर्देश गोंदिया रेल्वेस्थानकाला प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे प्लॅटफाॅर्म तिकिटाचा दर ५० रुपयेच कायम आहे. हावडा- मुंबई मार्गावरील गोंदिया हे प्रमुख रेल्वेस्थानक असून, लॉकडाऊनपूर्वी दररोज दीडशे गाड्या या रेल्वेस्थानकावर ये-जा करीत होत्या. आता ही संख्या ४० वर आली आहे. या रेल्वेस्थानकावर सद्य:स्थितीत ३ हजार प्रवासी ये-जा करीत आहेत, तर सध्या दररोज दीडशे प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री होत आहे. एकंदरीत आता सर्वच व्यवहार सुरळीत झाले असून, ये-जा करणाऱ्यांची संख्यासुद्धा वाढली आहे. प्लॅटफाॅर्म तिकीट विक्रीतसुद्धा वाढ झाली आहे.  

 प्रवासी संख्येत झाली वाढ

गोंदिया जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट राज्यात सर्वांत कमी आहे. त्यामुळेच जिल्ह्याचा अनलॉकच्या पहिल्याच स्तरात समावेश होता. ७ जूनपासून जिल्ह्यातील सर्वच व्यवहार सुरळीत झाले असून, बाहेरगावी ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येतसुद्धा वाढ झाली आहे. मागील आठवडाभरापासून प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत असून, दररोज ३ हजार प्रवासी ये-जा करीत आहेत.

 तिकीट वाढले तरी लॉकडाऊनपूर्वी गोंदिया रेल्वेस्थानकावरून दररोज दीडशे गाड्या धावत होत्या, तर २५ हजारांवर प्रवासी दररोज ये-जा करीत होते. मात्र, दीड वर्षापासून कोरोनामुळे रेल्वेची प्रवासी वाहतूकसुद्धा ठप्प होती. आतासुद्धा काही मोजक्याच रेल्वेगाड्या सुरू आहेत. त्यामुळे प्लॅटफाॅर्म तिकीट विक्रीची संख्या २० ते ३० वर आली होती. यामुळे गोंदिया रेल्वेस्थानकाचे दीड वर्षात प्लॅटफाॅर्म तिकिटाच्या माध्यमातून प्राप्त होणारे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.  

आठवडाभरापासून वाढली प्रवाशांची वर्दळकोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याने आता सर्वत्र अनलॉक करण्यात आले आहे. त्यामुळे बाहेरगावी ये-जा करणाऱ्यांची संख्यासुद्धा मागील आठवड्यापासून वाढली आहे. गोंदिया रेल्वेस्थानकावरून दररोज तीन हजारांवर प्रवासी ये-जा करीत आहेत. अद्याप लोकल आणि पॅसेंजर गाड्या सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे गर्दी वाढली नाही. या गाड्या सुरू झाल्यास प्रवासी संख्येत पुन्हा वाढ होऊ शकते, असे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रॉय यांनी सांगितले. 

 

टॅग्स :railwayरेल्वेticketतिकिट