शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

यंदा ६० लाख क्विंटल धान खरेदीचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 05:00 IST

जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात शासकीय धान खरेदी केली जाते. यासाठी शासनाची एजन्सी म्हणून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ हमीभावाने धान खरेदी करते. यंदा शासनाने शासनाने सर्वसाधारण धानाला १८६८ आणि अ दर्जाच्या धानाला १८८८ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. हमीभावापेक्षा कमी दर शेतकऱ्यांना मिळू नये यासाठी शासनाकडून धान खरेदी केली जाते.

ठळक मुद्दे७० धान खरेदी केंद्र : कर्मचाऱ्यांची समस्या कायम, बारदाना आला

लोकमत न्यूज नेटवर्कगोदिया : शासनाने खरीप हंगामातील शासकीय धान खरेदी सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. येत्या २५ ऑक्टोबरपासून धान खरेदीला सुरूवात होणार आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने यंदा ७० धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे नियोजन केले आहे.जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात शासकीय धान खरेदी केली जाते. यासाठी शासनाची एजन्सी म्हणून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ हमीभावाने धान खरेदी करते. यंदा शासनाने शासनाने सर्वसाधारण धानाला १८६८ आणि अ दर्जाच्या धानाला १८८८ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. हमीभावापेक्षा कमी दर शेतकऱ्यांना मिळू नये यासाठी शासनाकडून धान खरेदी केली जाते. जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख ९९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली.सध्या धानाची स्थिती पाहता यंदा समाधानकारक धानाचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने यंदा दोन्ही हंगामात एकूण ६० लाख क्विंटल धान खरेदी करण्याचे नियोजन केले आहे. मागीलवर्षी खरीप हंगामात ३७ लाख आणि रब्बी हंगामात २० लाख क्विंटल धान खरेदी केली होती. याच आधारावर हे नियोजन केले आहे. यासाठी ७० धान खरेदी केंद्र, ३९५ गोदामांची व्यवस्था केली आहे. खरेदीत वाढ झाल्यास गोदामांची संख्या वाढविली जाणार आहे. ७० केंद्रावर वेळेत धान खरेदी सुरू व्हावी यासाठी संबंधीत सहकारी संस्थाना यासंबंधिचे निर्देश देण्यात आले.कर्मचाऱ्यांची रिक्त पदे केव्हा भरणारशासकीय धान खरेदी केंद्रावरील सावळा गोंधळ पुढे येऊन सुध्दा अद्यापही या केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक कर्मचाºयांची पदे भरण्यात आली नाही. ४० कर्मचाऱ्यांची गरज असताना सध्या स्थितीत केवळ १२ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे धान खरेदी केंद्रावर नियंत्रण कसे ठेवणार असा प्रश्न कायम आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड