जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामातील धानाची कापणी आणि मळणी सुरू आहे. मात्र याच दरम्यान अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे शेतमालाची विक्री न करता आल्याने आधीच शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच शुक्रवारी दु ...
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनातर्फे संयुक्तपणे उपाययोजना राबविल्या जात आहे. याचेच फलित म्हणजे मागील २८ दिवसात जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. जिल्हा कोरोनामुक्त असल्याने केंद्री ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून देशात लॉकडाऊन सुरू झाले. या लॉकडाऊनमुळे अनेक कामगार विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. मजुरांना आता पायी जाण्याची मुभा देण्यात आली आहे. त्या पासेस व फिटनेस प्रमाणपत्र मिळवण्यासाठी उन्ह ...
जिल्ह्यात खरीपानंतर रब्बी हंगामात जवळपास ३५ हजार हेक्टरवर रब्बी धानाची लागवड केली जाते. शेतकऱ्यांना हमीभावा पेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केल ...
आता अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर गोंदियातून ५७७ नागरिकांना एस.टी. बसेमधून रवानगी करण्यात आली. यापूर्वी सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना सोबत जेवण, पाणी देण्यात आले. त्यांच्यासाठी मास्कची व ...
जवळपास ६०० कोटी रुपयांची धान खरेदी करण्यात आली असून यापैकी ५०० कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आले आहे. मात्र मार्च महिन्यात सर्वत्र कोरोनाचा शिरकाव झाल्याने सर्व व्यवहार ठप्प पडले. त्यामुळे शासनाकडून निधी प्राप्त होण्यास अडचण निर्माण झाली. परिणामी जिल् ...
गांधीटोला (सालईटोला) येथील डॉ. भूवन शंकर मेंढे यांची वडिलोपार्जित शेतजमीन गट नं.१८५ वनविभागाच्या जमिनीला लागून आहे. सदर शेतजमिनीत वाघनदीवर अधिकृत विद्युतपंप बसवून सिंचनाची सोय केली आहे. याच जमिनीत सिंहना, पळस, निंब व इतर झाडे लावली आहेत. ४ एप्रिलला ग ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी २४ मार्चपासून सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील जीवनावश्क वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्वच दुकाने मागील ४५ दिवसांपासून बंद होती. त्यामुळे व्यावसायीकांमध्ये सुध्दा ...
गोंदिया जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश असल्याने जिल्हा प्रशासनाने काही व्यवहारांना शिथिलता देण्याचा निर्णय घेतला. याच अंतर्गंत आठवड्यातून बुधवार, गुरूवार, शुक्रवार हे तीन दिवस काही दुकाने सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी दिली आहे. ...