दुर्मिळ वनस्पतींचे जतन करणे आपल्याच हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 07:23 PM2020-05-23T19:23:10+5:302020-05-23T19:23:53+5:30

गोंदिया जिल्हा जंगलव्याप्त असून विविधतेने नटलेला आहे. जिल्ह्यात अनके दुर्मिळ वनस्पती सुध्दा आहे. जगातील दोन तर महाराष्ट्रातील १९ दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या १९ वनस्पती केवळ गोंदिया जिल्ह्यात आढळतात.

It is up to you to save rare plants | दुर्मिळ वनस्पतींचे जतन करणे आपल्याच हाती

दुर्मिळ वनस्पतींचे जतन करणे आपल्याच हाती

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्रातील १९ दुर्मिळ वनस्पतींची नोंद : संवर्धनासाठी उपाययोजनांची गरज


अंकुश गुंडावार
गोंदिया : गोंदिया जिल्हा जंगलव्याप्त असून विविधतेने नटलेला आहे. जिल्ह्यात अनके दुर्मिळ वनस्पती सुध्दा आहे. जगातील दोन तर महाराष्ट्रातील १९ दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या १९ वनस्पती केवळ गोंदिया जिल्ह्यात आढळतात. या वनस्पतींचा मागील ३१ वर्षांपासून अभ्थास करुन त्यांचे संवर्धन करण्याचे काम आमगाव येथील भवभूती महाविद्यालयाचे प्राचार्य तथा वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. श्रीराम भुस्कुटे हे करीत आहेत.
गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात पाणथळ जागेत आढळणाºया अनेक वनस्पती असून राज्यात आढळणाºया पाणथळ वनस्पतींच्या ७८ टक्के वनस्पती केवळ गोंदिया जिल्ह्यात आढळतात.वनस्पती दृष्टया जैवविविधतेने नटलेल्या आपल्या जिल्ह्यातील दुर्मिळ वनस्पतींचे जतन करणे हे आपल्याच हाती असून त्यासाठी सर्वांनीच पर्यावरणा प्रती सजग राहण्याची गरज आहे. जिल्ह्यातील विविध दुर्मिळ वनस्पतींचा अभ्यास आणि त्यावर संशोधन करुन जगाला या वनस्पतींची माहिती व महत्त्व पटवून देण्याचे काम डॉ.भुस्कुटे करीत आहे. मागील ३१ वर्षांपासून त्यांच्यावर अभ्यास सुरू आहे. यातूनच त्यांनी नायकीया कर्नी व फिब्रीस्टॅलीस पोकळी या दोन वनस्पतींचा शोध घेवून जगाला माहिती दिली. तर देशात ज्या चार दुर्मिळ वनस्पती केवळ गोंदिया जिल्ह्यात आढळतात त्यात इलीओकॅरीस एन्सप्स, फिब्रीस्टॅलीस अ?ॅडीनोलेपीस, फिब्रीस्टॅलीस अबलोगा, स्कोपस प्रोलोंगट्स या वनस्पतींचा समावेश आहे. या वनस्पती अस्तित्व धोक्यात आहे. तसेच जिल्ह्यात ११ किटक भक्षी वनस्पती असून यामध्ये युट्रीक्युुॅरिया व ड्रॉसेरा या दोन प्रजातींच्या अनुक्रमे आठ व अनुक्रमे दोन जाती आढळतात. डॉ. श्रीराम भुस्कुटे यांनी युट्रीक्युॅरिया फोव्हुओलॅटा ही दुर्लभ किटक भक्षी वनस्पती शंभर वर्षांनंतर पुन्हा शोधून काढली हे विशेष. यापूर्वी ही वनस्पती आमगाव जवळील गोंडीटोला या गावालगत अतिशय छोट्या जागेत आढळली होती. या वनस्पतींचे जतन करणे फार महत्त्वाचे असून महाराष्ट्रात केवळ गोंदिया जिल्ह्यातच या १९ वनस्पती आढळतात. यामध्ये औषधीयुक्त गुणधर्म देखील असून त्यांचे फार महत्त्व आहे.

बासरी तयार करण्यासाठी उत्कृष्ट बांबु
सालेकसा तालुक्यातील दरेकसा हा परिसर जंगलाने समृध्द असा परिसर आहे. या जंगलात अनेक दुर्मिळ वनस्पती आढळून येतात. याच जंगलात एक बांबुची प्रजाती आढळून येते, जी महाराष्ट्रात इतरत्र कुठेही आढळून येत नाही. या बांबुचे शास्त्रीय नाव ह्यसायझोस्टॅकीयम परग्रासीलह्ण असून या बांबुपासून उत्कृष्ट बासºया तयार करता येतात. विशेष म्हणजे डॉ. श्रीराम भुस्कुटे यांनी या बांबुपासून बासºया तयार केल्या असून त्या करण्याचे सोपे तंत्र सुध्दा त्यांनी विकसीत केले आहे.

वनस्पतींचे संवर्धन करण्याची गरज
अपुष्प वनस्पती गोंदिया जिल्ह्यात विपुल प्रमाणात आढळतात.नेचे वगार्तील वनस्पती होमोनायटीस ऐरीफोलीया व ऑफीओग्लॉसम न्युडीकॉल व्हरायटी मॅकोरायझा या दोन वनस्पती केवळ गोंदिया जिल्ह्यातच आढळतात. सायलोटम न्युडम ही नेचे वर्गीय वनस्पती केवळ दरेकसा येथील अंबेझरण परिसरात आढळते. ही वनस्पती भारतातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तर काश्मिरात डल लेकमध्ये आढळणारी वनस्पती काटेचिला ही केवळ नवेगावबांध तलावात विपुल प्रमाणात आढळून येते. यासर्व वनस्पतींचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.

वनस्पती दृष्टया जैवविविधतेने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यातील दुर्मिळ वनस्पतींचे अस्तित्व आपल्यालाच टिकावायचे आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असून वनस्पतीशास्त्र शिकविणारे शिक्षक आणि शिकणारे विद्यार्थी व व वनस्पतीप्रेमी यांचा यात सहभाग महत्त्वपूर्ण आहे.
- डॉ.श्रीराम भुस्कुटे, प्राचार्य भवभूती महाविद्यालय आमगाव.

Web Title: It is up to you to save rare plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.