क्वारंटाईन व्यक्ती बाहेर आढळल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 05:00 AM2020-05-24T05:00:00+5:302020-05-24T05:00:01+5:30

केंद्र शासन व राज्य शासनाने निर्गमीत केलेल्या आदेशाचे अनुषंगाने जिल्ह्यातील मूळ रहिवासी जे इतर राज्यात अथवा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात ‘लॉकडाऊन’च्या काळात अडकलेले आहेत अशा मजूर, यात्रेकरु, सामान्य नागरिक व इतरांना त्यांच्या स्वजिल्ह्यात परत येण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात येत आहे.

Action if the quarantine person is found out | क्वारंटाईन व्यक्ती बाहेर आढळल्यास कारवाई

क्वारंटाईन व्यक्ती बाहेर आढळल्यास कारवाई

Next
ठळक मुद्देनागरिकांना माहिती द्यावी । उपविभागीय अधिकाऱ्यांनी काढले आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने अंमलबजावणी व कार्यवाही सुरु असून प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यात ‘लॉकडाऊन’ दरम्यान प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शिवाय परराज्य व जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन केले जात असून ते बाहेर फिरताना आढळून येत आहेत. अशांवर आता कारवाई केली जाणार असल्याचे आदेश उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी काढले असून नागरिकांनाही कुणी दिसून आल्यास माहिती द्यावी असे त्यांनी कळविले आहे.
केंद्र शासन व राज्य शासनाने निर्गमीत केलेल्या आदेशाचे अनुषंगाने जिल्ह्यातील मूळ रहिवासी जे इतर राज्यात अथवा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात ‘लॉकडाऊन’च्या काळात अडकलेले आहेत अशा मजूर, यात्रेकरु, सामान्य नागरिक व इतरांना त्यांच्या स्वजिल्ह्यात परत येण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात येत आहे.
परराज्य व जिल्ह्यातून गोंदिया तालुक्यात नागरी तसेच ग्रामीण भागात परत येणारे व्यक्ती, मजूर, यात्रेकरु, सामान्य नागरिक व इतरांपैकी काही व्यक्ती होम क्वारंटाईन नियमाचे पालन न करता गाव व शहरात इतरत्र फिरत असल्याचे निदर्शनास आले असून याबाबतच्या तक्रारी सुद्धा प्राप्त होत आहेत.
अशा व्यक्तींनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व बाहेर इतरत्र फिरताना आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंद करुन भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ नुसार कार्यवाही करण्यात येणार असे उपविभागीय अधिकारी सवरंगपते यांनी कळविले आहे.

प्रशासनाला सहकार्य करा
परराज्य व जिल्ह्यातून आलेली व्यक्ती क्वारंटाईन नियमांचे भंग करुन परिसरात फिरताना आढळून आल्यास त्याबाबत संबंधित पोलीस ठाणे, तहसीलदार, खंड विकास अधिकारी, नगर परिषद मुुख्याधिकारी, ग्रामपंचायत सचिव व स्थानिक आरोग्य विभागाला त्वरीत सूचना द्यावी व कोविड विषाणूचा संसर्ग टाळण्यास प्रशासनास सहकार्य करावे असे उपविभागीय अधिकारी सवरंगपते यांनी कळविले आहे.

Web Title: Action if the quarantine person is found out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.