कोरोना पार्श्वभूमीवर यंत्रणांनी दक्ष राहून काम करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 05:00 AM2020-05-25T05:00:00+5:302020-05-25T05:00:07+5:30

आयसोलेशन वॉर्डमध्ये असलेल्या रुग्णांची दररोज नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी. कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांचे समुपदेशन करण्यात यावे. क्षयरुग्णांची विशेष काळजी घेण्यात यावी असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्ह्यात जे पॉझिटीव्ह रु ग्ण आढळून आले आहेत, त्या रुग्णांवर योग्य ते उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

Systems should work diligently on the corona background | कोरोना पार्श्वभूमीवर यंत्रणांनी दक्ष राहून काम करावे

कोरोना पार्श्वभूमीवर यंत्रणांनी दक्ष राहून काम करावे

googlenewsNext
ठळक मुद्देसंजीव कुमार : कोरोना विषयक आढावा सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. परराज्य व जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींमुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना फैलाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष राहून काळजीपूर्वक काम करावे असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात शनिवारी (दि.२३) कोरोना विषाणू संदर्भात आयोजित आढावा सभेत ते बोलत होते. सभेला अपर आयुक्त अभिजित बांगर, पब्लिक हेल्थ फाउंडेशनचे डॉ. संजय झोडापे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. संजीव कुमार यांनी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. प्रत्येकाने टीमवर्क म्हणून काम करावे. कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हँडवॉशच्या वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी.
आयसोलेशन वॉर्डमध्ये असलेल्या रुग्णांची दररोज नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी. कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांचे समुपदेशन करण्यात यावे. क्षयरुग्णांची विशेष काळजी घेण्यात यावी असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्ह्यात जे पॉझिटीव्ह रु ग्ण आढळून आले आहेत, त्या रुग्णांवर योग्य ते उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
सभेला सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, राहुल खांडेभराड, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्मीता बेलपत्रे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.विनायक रु खमोडे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.हिंमत मेश्राम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, शिल्पा सोनाळे, रविंद्र राठोड, गंगाराम तळपाडे, गोंदिया नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील व आय.एम.ए.चे डॉक्टर्स उपस्थित होते.

Web Title: Systems should work diligently on the corona background

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.