फवारणी कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणीप्रमाणे आदेश द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:38 IST2021-06-16T04:38:22+5:302021-06-16T04:38:22+5:30

हंगामी फवारणी कर्मचारी हिवताप कार्यालयाच्या आस्थापनेवर सन १९७२ पासून आतापर्यंत फवारणीचे काम वेतनश्रेणीनुसार करत आहेत; परंतु आता त्यांना मजुरी ...

Order spraying staff according to pay scale | फवारणी कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणीप्रमाणे आदेश द्या

फवारणी कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणीप्रमाणे आदेश द्या

हंगामी फवारणी कर्मचारी हिवताप कार्यालयाच्या आस्थापनेवर सन १९७२ पासून आतापर्यंत फवारणीचे काम वेतनश्रेणीनुसार करत आहेत; परंतु आता त्यांना मजुरी पद्धतीने कामाचे आदेश देण्यात आले आहे. याबाबत कित्येकदा पत्र व्यवहार करूनही त्याचा काहीच फायदा झाला नाही. अशात, फवारणी कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणीप्रमाणे आदेश पारित करा, सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देऊन सातवा वेतन आयोग त्वरित लागू करा, सेवाज्येष्ठतेनुसार रिक्त पदांवर समावेश करा, वर्षातून किमान ११ महिने काम द्या, त्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्व लागू करा तसेच ज्या फवारणी कर्मचाऱ्यांचे वय झाले आहे अशांना पेन्शन योजना लागू करा, अशी मागणी आरोग्य कर्मचारी महासंघाने केली आहे. या मागण्यांसाठी महासंघाने जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना सोमवारी (दि.१४) निवेदन दिले असून येत्या सोमवारपासून (दि.२१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपाेषणावर बसण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: Order spraying staff according to pay scale