केवळ 'मोबाईल मॅसेज'द्वारे परिणय

By Admin | Updated: May 10, 2014 00:37 IST2014-05-10T00:37:32+5:302014-05-10T00:37:32+5:30

न्यू स्पोर्ट स्टेडियम मरारटोली बौद्धनगर परिसरात बुद्धिस्ट समाज संघाद्वारे तयार होत असलेल्या वृद्धत्व पार्कमध्ये सुशील बन्सोड व संबोधी नागदेवे यांचा मंगल परिणय पार पडला.

Only result from 'mobile message' | केवळ 'मोबाईल मॅसेज'द्वारे परिणय

केवळ 'मोबाईल मॅसेज'द्वारे परिणय

गोंदिया : न्यू स्पोर्ट स्टेडियम मरारटोली बौद्धनगर परिसरात बुद्धिस्ट समाज संघाद्वारे तयार होत असलेल्या वृद्धत्व पार्कमध्ये सुशील बन्सोड व संबोधी नागदेवे यांचा मंगल परिणय पार पडला. या मंगल परिणयाचे वैशिष्ट म्हणजे परिणयासाठी कसल्याही प्रकारचे निमंत्रण पत्रिका वाटण्यात आल्या नाही. केवळ मोबाईलवर संदेश देवून अत्यंत साध्या पद्धतीने पार पडलेला हा विवाह सोहळा चर्चेचा विषय झाला आहे.
आजच्या धकाधकीच्या काळात लग्न सोहळ्यांमध्ये अवाढव्य खर्च करणे परवडणारे नसते. शिवाय प्रत्येक माणूस आजच्या काळात एवढा व्यस्त झाला आहेत की त्याच्याकडे नेहमीच वेळेचा अभाव असतो. अशा मंगल परिणयाने वेळ व पैसा या दोन्ही बाबींची बचत होवून एक नवीन आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. साक्षगंध, हळदीची परंपरा, अहेर, भेटवस्तू, हुंडा अशा कोणत्याही प्रकारचा लेन-देण करण्यात आले नाही. बँडवाजा, डीजे व डेकोरेशन यासारख्या आडंबरावर खर्च न करता विवाह हर्षोल्हासात पार पडला. यावेळी सुशील यांनी बुद्धिस्ट संघाचे १५ हजार रूपये शुल्क भरून आजीवन सदस्यता ग्रहण केली. ते एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्य करीत आहेत. संबोधी ही बी.एससी. व एमएसडब्ल्यू शिक्षित असूनही तिने परिणय सोहळ्याच्या या परिवर्तनासाठी स्वेच्छेने स्वीकृती दिली. याप्रसंगी दोन्ही पक्षाचे अत्यंत सीमित पाहुणे उपस्थित होते. बदलत्या काळात हा विवाह सोहळा युवा वर्गासाठी सामाजिक परिवर्तनाचाच संदेश असून महापुरूषांच्या विचारांच्या अनुकूल आहे.
अशा प्रकारच्या परिणय सोहळ्यास प्रोत्साहन देण्यासाठी बुद्धिस्ट समाज संघाचे एल्डर पार्क नि:शुल्क उपलब्ध करविण्याचे आवाहन बुद्धिस्ट समाज संघाने केले आहे. कार्यक्रमाचे संचालन डी.एन. रामटेके यांनी, प्रास्ताविक प्रा. आर.एस. मडामे यांनी तर आभार अँड. प्रज्ञा नरेंद्र डोंगरे यांनी मानले. यावेळी संघाचे उमेश नागदेवे, विनोद मोटघरे, डी.डी. मेश्राम संजय गणवीर, दिपेंद्र वासनिक आदी उपस्थित होते.

Web Title: Only result from 'mobile message'