शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

केवळ २३ टक्के पालकांनी दिले आतापर्यंत संहमतीपत्र !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 05:00 IST

२३ नाेव्हेंबर विद्यालय सुरु झाली असले तरी अद्यापही विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत नसल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये अजूनही कोरोनाची भिती कायम आहे. शाळा सुरु होवून तीन दिवसांचा कालावधी लोटला असून ११२२१ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत हजेरी लावली आहे. त्यामुळे अजुनही विद्यार्थ्यांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. 

ठळक मुद्दे२२६ शाळा झाल्या सुरु : जिल्ह्यातील १४० शिक्षकांना कोरोना

 लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शालेय शिक्षण विभागाने २३ नोव्हेंबरपासून ९ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरु केले आहे. यासाठी शिक्षकांची कोरोना चाचणी आणि विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांचे संहमतीपत्र  अनिवार्य करण्यात आले. मात्र आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ २३ टक्केच पालकांनी संहमतीपत्र दिले आहे. तर ३६९ पैकी २२६ शाळा सुरु झाल्या असून  केवळ १८ टक्केच विद्यार्थ्यांनी विद्यालयात हजेरी लावली आहे. जिल्ह्यात ९ वी ते १२ वीपर्यंतच्या एकूण ३६९ शाळा असून यातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या ६१३०१ आहे. २३ नाेव्हेंबर विद्यालय सुरु झाली असले तरी अद्यापही विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत नसल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये अजूनही कोरोनाची भिती कायम आहे. शाळा सुरु होवून तीन दिवसांचा कालावधी लोटला असून ११२२१ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत हजेरी लावली आहे. त्यामुळे अजुनही विद्यार्थ्यांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. ३६९ शाळांमध्ये ३३१९ शिक्षक कार्यरत असून यापैकी आतापर्यंत २८०९ शिक्षकांची कोरोना चाचणी झाली आहे. यापैकी बऱ्याच शिक्षकांचा चाचणी अहवाल अद्यापही प्राप्त झाला नसून आतापर्यंत १४० शिक्षकांना कोरोनाची बाधा झालीे आहे. पालक-शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या मंजुरीनेच विद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला जात आहे. 

स्वॅब टेस्टमुळे शिक्षकांची संख्या कमीजिल्ह्यात ९ वी ते १२ वीच्या एकूण ३६९ शाळा असून यामध्ये ३३१९ शिक्षक कार्यरत आहेत. यापैकी २८०७ शिक्षकांची कोरोना चाचणी झाली असून ९४७ शिक्षकांचा अहवाल प्राप्त झाला आहे. कोरोनाचा अहवाल प्राप्त न होणाऱ्या शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने विद्यालय सुरु होण्यास विलंब होत आहे

 आतापर्यंत जिल्ह्यातील २२६ शाळा सुरु झाल्या आहेत. उर्वरित शाळा सुरु करताना पालक-शिक्षक समिती, शालेय व्यवस्थापन समिती आणि शाळा व्यवस्थापन यांच्या सर्वांच्या संहमतीने शाळा सुरु करण्याचा किंवा न करण्याचा निर्णय घेतला जात आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची चाचपणी केली जात आहे. - प्रफुल्ल कचवे, शिक्षणाधिकारी

टॅग्स :SchoolशाळाCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या