शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील डॉक्टरांचे असहकार आंदोलन

By admin | Updated: May 27, 2014 23:48 IST

शासन नेहमीच आपल्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना (मॅग्मो) ने असहकार आंदोलन सुरू केले आहे.

गोंदिया : शासन नेहमीच आपल्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना (मॅग्मो) ने असहकार आंदोलन सुरू केले आहे. २७ मे ते ३१ मे दरम्यान हे आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.चंदू वंजारे यांनी स्थानिक शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली.

सेवा समावेशवन झालेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांना पूर्व लक्ष लाभ दिलेला नाही, राज्यातील वैद्यकीय अधिकार्‍यांना सहाव्या वेतन आयोग २00६ पासून लागू केला नाही, अस्थायी एमबीबीएस, बीएएमएस, बीडीएस वैद्यकीय अधिकार्‍यांना अजूनही स्थायी करण्यात आले नाही. केंद्र शासन व इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील डॉक्टरांना वेतन दिले जात नाही. सेवाअंतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमासंबधीत निश्‍चित धोरण नाही. केंद्रशासन व इतर राज्याप्रमाणे डॉक्टराचे कामाचे तास निश्‍चित करणे व सेवानवृत्तीचे वय ६२ वर्ष करणे तसेच व्यवसायरोध भत्ता ऐच्छीक करण्यात यावे, आरोग्य विभागाचा पुनर्रचना आयोग स्थापन केल्या जावा या मागण्यांना घेऊन मॅग्मोने असहकार आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनादरम्यान ३0 मे पर्यंत बाह्य व आंतररुग्ण सेवा सुरू राहणार आहे. उत्तरीय तपासणी व एमएलसी करण्यात येणार आहे. परंतु शासनाच्या सर्व आढावा सभावर डॉक्टरांनी बंदी घातली आहे. कोणत्याही सभेला उपस्थित राहणार नाही असा पवित्रा मॅग्मोने घेतला आहे.

शासनाने ३१ मे पर्यंत डॉक्टरांची दखल घेतली नाही किंवा सकारात्मक विचार केला नाही तर ३१ मे रोजी सकाळी १0 ते दुपारी ३ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन सादर करणार आहे. त्यावरही शासन ऐकले नाही तर २ जून रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या असहकार आंदोलनात राज्यातील ७८९ बीएएमएस तर ३२ बीडीएस डॉक्टर सहभागी झाले आहेत.

गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या आरोग्य विभागातील १६२ तर जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या अंतर्गत येत असलेले ८२ असे २८४ डॉक्टर असहकार आंदोलनात सहभागी झाले. गोंदिया जिल्ह्यातील २९ डॉक्टर अजूनही अस्थायी आहेत. एमबीबीएस पदव्युत्तर व बीएएमएस पदव्युत्तर वैद्यकीय अधिकार्‍यांना सेवाजेष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात यावी, वरिष्ठ अधिकार्‍यांना ३ व ६ आगावू वेतन देण्यात यावे या मागण्यांना घेऊन आंदोलन करण्यात येणार आहे. परंतु २ जूनपर्यंत शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास जिल्ह्यात कामबंद आंदोलन पुकारण्याचा इशारा मॅग्मोने दिला आहे.

यावेळी अध्यक्ष डॉ. चंदू वंजारे, डॉ.विनोद वाघमारे, डॉ. विनोद चव्हाण, डॉ.पी.जी. शेडमेक, डॉ.आर.डी. त्रिपाठी, डॉ. विवेक अनंतवार, डॉ. संजय गुज्जनवार, डॉ. रवि शेंडे, डॉ. अमित खोडणकर, डॉ.उज्वल देवकाते व इतर डॉक्टर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)