शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

नवयुवकांच्या नि:स्वार्थी कार्यापासून प्रेरणा घेण्याची गरज

By admin | Updated: January 12, 2015 22:53 IST

श्री अर्धनारेश्वरालय ट्रस्टच्या १५ नवयुवकांच्या नि:स्वार्थी कामापासून पे्ररणा घेऊन जनतेने कार्य करायला पाहिजे. नवयुवकांनी कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न बाळगता जनतेसाठी नि:शुल्क सभागृह,

सालेकसा : श्री अर्धनारेश्वरालय ट्रस्टच्या १५ नवयुवकांच्या नि:स्वार्थी कामापासून पे्ररणा घेऊन जनतेने कार्य करायला पाहिजे. नवयुवकांनी कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न बाळगता जनतेसाठी नि:शुल्क सभागृह, भांडी, डेकोरेशन उपलब्ध करुन समाजात उत्तम आदर्श निर्माण केला. अशा या कार्यापुढे मी नतमस्तक आहे, असे प्रतिपादन आमदार संजय पुराम यांनी व्यक्त केले. ते श्री अर्धनारेश्वरालय शिवगण मंदिर परिसरात आयोजित सत्कार समारंभात बोलत होते.अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती राकेश शर्मा होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सुरेश शेंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरलाल मडावी, आदिवासी सोसायटीचे संचालक उमेदलाल जैतवार, गणेश फरकुंडे उपस्थित होते. यावेळी अर्धनारेश्वर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांक डून शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन आमदार पुराम यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय मार्गदर्शनात शर्मा यांनी नवयुवकांचे कौतुक करुन त्यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा केली, व सालेकसा तालुक्यात एक उत्तम सर्व सोयीने उपयुक्त पर्यटनस्थळ निर्माण केल्यामुळे तालुकावासियांसाठी ही गौरवाची बाब असल्याचे सांगितले.प्रास्ताविक करुन संचालन सचिव बाजीराव तरोणे यांनी केले. आभार ट्रस्टचे उपाध्यक्ष गोविंद वरखडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी बिंदेश्वरी बावनथडे, ममता कापसे, द्वारका शेंडे, लक्ष्मी तरोने, हंसकला शेंडे, चेतन बिसेन, टेमेंद्र बिसेन, भरत साहू, दुर्गाप्रसाद साहू, पवन पटले, नवीन भेंडारकर, लोकेश कोरे, प्रदीप उईके, सुरेश कोटांगले, संतोष कापसे, रमेश फरकुंडे, रमेश कापसे, मुनेश्वर कापसे, राधेलाल धुर्वे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)