शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
4
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
5
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
6
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
7
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
8
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
9
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
10
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
11
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
12
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
13
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
14
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
15
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
16
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
17
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
19
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
20
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक संकटाने अनेक गावातील शेतकरी हतबल

By admin | Updated: November 22, 2014 00:47 IST

गोंदिया हा तलावाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर नोंद आहे. तसेच वनसंपत्तीने नटलेला जिल्हा म्हणून विशेष ओळख आहे.

केशोरी : गोंदिया हा तलावाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर नोंद आहे. तसेच वनसंपत्तीने नटलेला जिल्हा म्हणून विशेष ओळख आहे. या जिल्ह्यातील उपेक्षित भाग म्हणून अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील आदिवासीबहुल असणारा केशोरी परिसर. या परिसरात सिंचनाची आणि औद्योगिक विकासाची वानवा असल्यामुळे या परिसरातील शेतकरी पूर्णत: धान पिकाच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. परंतु वारंवार उद्भणाऱ्या नैसर्गिक संकटामुळे येथील शेतकरी हतबल झाले आहेत.नियतीच्या चक्रव्युहाने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना निसर्गाने छळले आहे. वेळोवेळी बदलणाऱ्या वातावरणामुळे बऱ्याच प्रमाणात धानपिकावर रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला होता. त्यावर मात करून शेतकऱ्यांनी धानाला लागलेल्या रोगावर नियंत्रण मिळविण्यास यश मिळविले. दिवाळीनंतर पावसाच्या सरी बरसल्याने काही शेतकऱ्यांची धान कापणी पाण्यात सापडली. अशा अनेक नैसर्गिक यातना केशोरी परिसरातील शेतकऱ्यांच्या नशिबी आल्या आहेत. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले तरी शेतकऱ्यांनी आपले धानपीक कसेबसे जगवले. त्यानंतर तुडतुडा, करपा, खोडकिडा यासारखे रोग आले. धानाच्या रोगांवर महागडी औषधी फवारून नियंत्रण ठेवण्यात यश आले, तरी पाहिजे त्या प्रमाणात धानपिकाच्या उत्पन्नाचा उतारा मिळत नसल्याने शेतकरीवर्ग विवंचनेत सापडल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे दुर्दैवी शेतकऱ्यांनी निसर्गासमोर हात टेकले आहेत. या परिसरातील जांभळी, उमरपायली, डोंगरगाव, आंभोरा, बारव्हा, गवर्रा, गार्डनपूर, परसटोला, अरसतोंडी, धमदीटोला, इळदा, राजोली, भरनोली, खडकी, कन्हाळगाव या गावातील शेतकऱ्यांची धानपिके सिंचनाअभावी करपली जातात. या प्रकरणांची या परिसरातील नुकसानीची दाहकता व वास्तव प्रसारमाध्यमे सतत शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु या उपेक्षित भागाकडे आमदार, खासदार आदी लोकप्रतिनिधींचे मुळीच लक्ष नाही. त्यामुळेच या परिसरातील शेतकरी आपल्या नशिबाचे भोग भोगत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)