शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाचा भार कायम

By admin | Updated: January 10, 2015 22:57 IST

विजेच्या उपलब्धतेत झालेली वाढ व तत्सम कारणांमुळे महावितरणने गोंदिया विभागांतर्गत येणाऱ्या तीन तालुक्यात फिडरवरील भारनियमनाच्या कालावधी व वेळेत बदल केले आहेत.

गोंदिया : विजेच्या उपलब्धतेत झालेली वाढ व तत्सम कारणांमुळे महावितरणने गोंदिया विभागांतर्गत येणाऱ्या तीन तालुक्यात फिडरवरील भारनियमनाच्या कालावधी व वेळेत बदल केले आहेत. महावितरणने केलेले हे बदल ३ जानेवारीपासून लागू झाले आहेत. विशेष म्हणजे यातील आकडेवारी बघितल्यास ४६ पैकी १७ फिडर्सवर आजघडीला भारनियमन सुरू आहे. यातील रतनारा फिडरवर सर्वाधिक ९.१५ तासांचे भारनियमन सुरू असल्याचे दिसून येत असून उर्वरीत फिडर्सवर वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर भारनियमन सुरू करण्यात येणार असल्याचे कळले.महावितरणने ठरवून दिल्यानुसार, ४६ फिडर्सच्या वेळापत्रकांत बदल करण्यात आला आहे. यातील १७ फिडर्सवर आजघडीला भारनियमन सुरू असून उर्वरीत फिडर्स भारनियमनमुक्त आहेत. विशेष म्हणजे काही फिडर्सवर आजघडीला भारनियमन होत नसले तरी वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर या फिडर्सवरील ग्राहकांनाही भारनियमनाचा फटका सहन करावाच लागणार असल्याचे महावितरणने स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे भारनियमनाच्या करंटपासून कुणीही सुटणार नाही हे मात्र नक्की. (शहर प्रतिनिधी)