लॉकडाऊनमध्येही ४६५ वाहन चालकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 05:00 AM2020-04-03T05:00:00+5:302020-04-03T05:00:09+5:30

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २२ मार्चला जनतेचा लॉकडाऊन करण्यात आला. परंतु २३ मार्चपासून केंद्र व राज्यसरकाने कोरोनाशी निपटण्यासाठी लॉकडाऊन केला आहे.त्या लॉकडाऊनमध्येही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्यामुळे त्यांच्यावर वाहतूक नियमान्वये कारवाई करून दंड वसूल करण्याची जोरदार मोहीम जिल्हा वाहतूक शाखेने चालविली आहे.

Lockdown also punishes 465 drivers | लॉकडाऊनमध्येही ४६५ वाहन चालकांना दंड

लॉकडाऊनमध्येही ४६५ वाहन चालकांना दंड

Next
ठळक मुद्देरस्त्यावर आल्यास खबरदार : एक लाखाच्या घरात दंड वसूल, वाहतूक नियंत्रण विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कारोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला तरीही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्याने गोंदिया जिल्हा वाहतूक पोलिसांनी २३ मार्च ते २ एप्रिलच्या दुपारपर्यंत ४६५ वाहन चालकांना दंड आकारून त्यांच्याकडून एक लाख रूपयाच्या घरात दंड ठोठावून वसुलही केला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २२ मार्चला जनतेचा लॉकडाऊन करण्यात आला. परंतु २३ मार्चपासून केंद्र व राज्यसरकाने कोरोनाशी निपटण्यासाठी लॉकडाऊन केला आहे.त्या लॉकडाऊनमध्येही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्यामुळे त्यांच्यावर वाहतूक नियमान्वये कारवाई करून दंड वसूल करण्याची जोरदार मोहीम जिल्हा वाहतूक शाखेने चालविली आहे. विनाकारण रस्त्यावर येणाऱ्या अश्या ४६५ लोकांना २३ मार्च ते १ एप्रिल या दहा दिवसात दंड करण्यात आला आहे.
चारचाकी किंवा दुचाकी वाहन चालक रस्त्यावर फिरू नयेत म्हणून पोलिसांनी कायद्याची कडक अमंलबजावणी सुरू केली आहे. कारण नसताना एखादा व्यक्ती रस्त्यावर आढळला. पोलिसांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास त्या वाहन चालकाला थांबवून त्याच्या वाहनात किंवा वाहन चालवितांना कोणत्या-ना कोणत्या तृट्या दाखवून पोलीस कारवाई करीत आहेत. लॉकडाऊनमुळे वाहतूक पोलीस आणखीच कडक नियम लावून कारवाई करीत आहे. हे कडक नियम कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उचललेले योग्य पाऊल आहे.
२३ मार्चपासून कारवाई करण्याचा सपाटा लावला त्यात दुचाकी, चारचाकी अशा ४६५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ९७ हजार ६०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. लॉकडाऊनचे पालन व्हावे हा एकमेव या मागचा उद्देश आहे. रस्त्यावरून येणाºया-जाणाºया प्रत्येक वाहनाची कसून चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. कारण नसताना वाहन रस्त्यावर आले की त्या वाहनाला दंड कसा करायचा याच्याच प्रयत्नात वाहतूक पोलीस दिसत आहेत. हे जरी वाहन चालकांना योग्य वाटत नसले तरी आजघडीला वाहतूक पोलिसांकडून करण्यात येणारी ही कारवाई समाजाच्या हिताची आहे. दंडामुळे विनाकारण लोक रस्त्यावर येणार नाहीत आणि कोरोनाच्या लढाईत सर्व जिंकतील हा या मागचा उद्देश आहे.

विनाकारण कुणीही घराबाहेर पडू नये. वाहन रस्त्यावर आले तर चौकशी होणारच. कारण नसताना वाहन चालक रस्त्यावर आला तर त्याच्यावर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करणे अटळ आहे.
- दिनेश तायडे
पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा गोंदिया.

Web Title: Lockdown also punishes 465 drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.