तलाव खोलीकरणाच्या कामाला सुरु वात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 05:00 AM2020-06-02T05:00:00+5:302020-06-02T05:00:41+5:30

कोरोनाच्या प्रादुर्भाव बघता गेल्या २२ मार्चपासून संचारबंदी राज्यात लागू करण्यात आली आहे. यामुळे सर्वच उद्योगधंदे ठप्प पडले होते. आता हळुवार सुरूवात होत आहे. मात्र ग्रामीण भागातील लोकांच्या रोजगारासाठीचा एकमेव आधार म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असून ही कामे बंद असल्याने ग्रामीण भागातील जनता अडचणीत आली आहे.

Lake deepening work begins | तलाव खोलीकरणाच्या कामाला सुरु वात

तलाव खोलीकरणाच्या कामाला सुरु वात

Next
ठळक मुद्दे१३८६ मजुरांच्या हाताला काम : कुंभरे तलाव व मिरगी बोडीचे खोलीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जलसंधारण प्रकारातील ढेकलु कुंभरे तलावाच्या खोलीकरणाचे काम शुक्रवारी (दि.२९) तर मिरगी बोडी खोलीकरणाचे काम शनिवारी (दि.३०) सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या २ महिन्यांपासून हातावर हात मांडून बसलेल्या शेकडो मजुरांच्या हाताला मनरेगामुळे काम मिळाले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भाव बघता गेल्या २२ मार्चपासून संचारबंदी राज्यात लागू करण्यात आली आहे. यामुळे सर्वच उद्योगधंदे ठप्प पडले होते. आता हळुवार सुरूवात होत आहे. मात्र ग्रामीण भागातील लोकांच्या रोजगारासाठीचा एकमेव आधार म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असून ही कामे बंद असल्याने ग्रामीण भागातील जनता अडचणीत आली आहे. कामे नसल्यामुळे ग्रामीण जनता हातावर हात देऊन घरी बसले होते. त्यामुळे ना-रोजी, ना-रोटी अशी हलाखीची अवस्था ग्रामीण भागातील मजुरांची झाली होती.
अशा हलाखीच्या वेळी शुक्रवारी (दि.२९) नवेगावबांध येथे तलाव खोलीकरणाचे काम सुरू झाले. त्यामुळे मागील २ महिन्यांपासून बेरोजगार असलेल्या मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. या कामावर अकुशल चार लाख ६४ हजार तर कुशल १८ हजार ३७६ असे एकूण चार लाख ८३ हजार ३७९ रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या कामावर गावातील २१४ पुरुष तर ५२३ महिला असे एकूण ७३७ मजूर काम करीत आहेत. तर मिरगी बोडी खोलीकरण कामावर २४३ पुरुष व ४०६ महिला असे एकूण ६४९ मजूर आहेत.
या कामावर अकुशल चार लाख ८७ हजार ४८५ रु पये तर कुशल पाच हजार ४२९ असे एकूण चार लाख ९२ हजार ९१४ रु पये खर्च करण्यात येणार आहेत. या दोन्ही कामांतून चार हजार ६२३ मनुष्य दिवस काम गावातील मजुरांना मिळणार आहे. या कामांवर गावातील एक हजार ३८६ मजुरांना काम मिळाले आहे असून त्यांना आर्थिक हातभार लागला आहे.

एकाच कामावर जास्त गर्दी होऊ नये, यासाठी मनरेगा अंतर्गत तलाव खोलीकरणाच्या कामासह ३ कामे सुरू करण्यात आली आहे. तोंडावर रुमाल किंवा मास्क बांधूनच स्त्री-पुरु ष मजुरांनी कामावर यावे अशा सूचना दिलेल्या आहेत. सॅनिटायझर, हात धुण्याचे पाणी व प्राथमिक उपचाराची व्यवस्था कामावर करण्यात आली आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जावे याची काळजी घेतली जात आहे.
-विलीन बडोले , रोजगार सेवक, नवेगावबांध.

Web Title: Lake deepening work begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी