शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे संसार उघड्यावर

By admin | Updated: November 16, 2015 01:43 IST

प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे जिल्ह्यात शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या अनेक वर्षांपासून रखडल्यामुळे या शिक्षकांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे.

मायेचा आधार दूर : आता आक्रमक होणारगोंदिया : प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे जिल्ह्यात शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या अनेक वर्षांपासून रखडल्यामुळे या शिक्षकांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. कर्तव्याचे ठिकाण एका टोकावर तर कुुटुंबातील प्रिय व्यक्ती दुसऱ्या टोकावर अशा परिस्थितीमुळे या शिक्षकांचे मन सैरभैर झाले आहे. रखडलेल्या आंतरजिल्हा बदल्यांना कंटाळून आता या शिक्षकांनी आक्रमक भूमिका घेण्याचे ठरविले आहे.राज्यभर कार्यरत असणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील ३०० ते ३५० भूमिपुत्रांना संबंधित जिल्हा परिषदेचे नाहरकत प्रमाणपत्र मिळूनही गोंदिया जिल्हा परिषद त्यांना अनेक वर्षापासून पदस्थापना देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. एकीकडे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पदवीधर, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांची पदे पदोन्नतीने भरणे आवश्यक असतानाही त्या पदोन्नत्या अनेक वर्षापासून केल्या नाहीत. त्यामुळे शिक्षकांच्या जागा रिक्त होत नाही. तसेच सेवानिवृत्तीने रिक्त झालेले पदसुद्धा भरण्यात आले नाही.जिल्हा बदलीसंदर्भात गोंदिया जिल्हा परिषदेत चौकशी करण्यासाठी जाणाऱ्यांना प्रशासनाकडून योग्य वागणूक मिळत नाही. आंतरजिल्हा बदलीसंदर्भात स्थगिती उठवणारा अध्यादेश शासनाने काढूनही जिल्हा परिषद प्रशासनाला आंतरजिल्हा बदल्यांना मुहूर्त सापडत नाही. जिल्हा बदली आज होईल, उद्या होईल या भाबळ्या आशेवर आंतरजिल्हा बदलीग्रस्त भूमिपूत्र शिक्षक व त्यांचे कुटुंब जगत आहेत. जिल्हा परिषदेचे अधिकारी व पदाधिकारी यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून आमच्या लेकरांना गोंदिया जिल्हा परिषदेत बदल्या द्याव्यात, अशी अपेक्षा कुटुंबीय करीत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)