शासकीय धान खरेदी होणार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 06:00 AM2020-02-14T06:00:00+5:302020-02-14T06:00:28+5:30

सध्या खरीप हंगामातील धान खरेदी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत सुरू आहे. या दोन्ही विभागानी आत्तापर्यंत ३० लाख क्विंटल धान खरेदी केली आहे. तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर दररोज ५० ते ७० हजार क्विंटल धानाची आवक सुरू आहे. फेडरेशनने आत्तापर्यंत खरेदी केलेल्या २१ लाख क्विंटल धानापैकी आत्तापर्यंत केवळ ७ लाख ७१ क्विंटल धानाची भरडाई झाली आहे.

Government paddy to be purchased jam | शासकीय धान खरेदी होणार ठप्प

शासकीय धान खरेदी होणार ठप्प

Next
ठळक मुद्दे१४ लाख क्विंटल धानाची भरडाई थांबली : दररोज ५० हजार क्विंटल धान खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील गोदामांमध्ये पडून असलेल्या मागील वर्षीच्या ६० हजार मेट्रीक टन तांदळाची अद्यापही उचल करण्यात आली नाही. परिणामी यावर्षी भरडाई केलेला १० लाख क्विंटल तांदूळ ठेवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या चार पाच दिवसात या धानाची उचल न झाल्यास शासकीय धान खरेदी ठप्प होणार आहे.
सध्या खरीप हंगामातील धान खरेदी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत सुरू आहे. या दोन्ही विभागानी आत्तापर्यंत ३० लाख क्विंटल धान खरेदी केली आहे. तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर दररोज ५० ते ७० हजार क्विंटल धानाची आवक सुरू आहे.
फेडरेशनने आत्तापर्यंत खरेदी केलेल्या २१ लाख क्विंटल धानापैकी आत्तापर्यंत केवळ ७ लाख ७१ क्विंटल धानाची भरडाई झाली आहे. तर जवळपास १३ लाख क्विंटल धान भरडाईअभावी शासकीय धान खरेदी केंद्रावर तसाच पडून असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.
शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात येणाऱ्या धानाची राईस मिलर्सशी करार करुन भरडाई केली जाते. त्यानंतर राईस मिलर्स धानाची भरडाई करुन सीएमआर तांदूळ शासनाकडे जमा करतात. त्यानंतर या धानाची गोदामांमध्ये साठवणूक केली जाते. साठवणूक केलेला तांदूळ शासनाकडून आदेश मिळाल्यानंतर विविध जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानादारांना पुरवठा केला जातो.
गोंदिया येथे ६० हजार मेट्रीक टन क्षमतेचे तांदळाचे गोदाम आहे. मात्र अद्यापही या गोदामांमध्ये मागील वर्षीचा ६० हजार मेट्रीेक टन तांदूळ तसाच पडला आहे. याची अद्यापही उचल करण्यात आली नाही. त्यामुळे यंदा भरडाई केलेला तांदूळ ठेवायचा कुठे अशी समस्या निर्माण झाली आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाला एकूण २५१५ रुपये दर मिळत असल्याने केंद्रावर मोठ्या प्रमाणात धानाची आवक वाढली आहे.
अशीच आवक सुरू राहिल्यास ३० लाख क्विंटलहून अधिक धान खरेदी होण्याची शक्यता फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. मात्र जोपर्यंत केंद्रावरील आणि गोदामातील धानाची उचल केली जात नाही. तोपर्यंत खरेदी केलेला धान ठेवायचा कुठे त्यामुळे धानाची उचल होईपर्यंत धान खरेदी बंद ठेवण्यासाठी गुरूवारी मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाºयांचे विचार मंथन सुरू होते.

तांदळाची उचल न होण्याचे कारण गुलदस्त्यात
जिल्ह्यात ६० हजार मेट्रीकटन क्षमतेचे गोदाम आहे. मात्र या गोदामातील तांदळाची उचल करण्याचे आदेश अद्यापही शासनाकडून प्राप्त झालेले नाही.त्यामुळे भरडाई केलेला तांदूळ आणि खरेदी केलेला १४ लाख क्विंटल धान ठेवायचा कुठे असा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र तांदळाची उचल करण्याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.
जिल्हा प्रशासनाची बघ्याची भूमिका
भरडाईसाठी धानाची खरेदी केंद्रावरुन उचल न झाल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. धान खरेदी बंद करण्याची वेळ जिल्हा मार्केटिंग फेडरेशनवर आली असताना अद्यापही जिल्हा प्रशासनाने यावर कुठलाच तोडगा काढला नाही.

Web Title: Government paddy to be purchased jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.